🌟दै. क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते यांना संसदरत्न खा. डॉ.फौजिया खान यांच्या हस्ते 'सेवारत्न पुरस्कार-२०२४' प्रदान...!


🌟यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेशराव देशमुख हे होते🌟

परभणी (दि.२८ नोव्हेंबर) - एकता सेवाभावी संस्था (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अरुणजी मराठे यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत संसद रत्न खासदार डॉ. फौजिया खान,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुरेशराव देशमुख, स्वागताध्यक्ष ऍड.पवन निकम यांच्या उपस्थितीत सेवारत्न पुरस्कार २०२३ मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन एकता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी परभणी शहरातील श्री मंगल कार्यालय स्टेशन रोड परभणी येथे दि.२७ नोव्हेंबर  २०२३ रोजी आयोजित केले होते. या पुरस्कार सोहळ्यात ७५ जणांना शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा  सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यात परभणी जिल्ह्याच्या माती मध्ये गेली तिन वर्षांपासून सातत्यपूर्ण शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, वंचित, शोषित, पिडीत, उपेक्षीत समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी क्रांतिज्योती, क्रांतीसुर्याचे ब्रम्हास्त्र (शेतकऱ्याचा आसुड) घेवून लोकांच्या हक्कासाठी झगडण्याचा संकल्प करुन त्यांचे सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतीक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न, समस्या, वेदना, म्हणणे, जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी दैनिक क्रांतीशस्त्रच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मौजे सिरकळस - येथील संपादक धम्मपाल यादवराव हानवते हे सातत्याने प्रयत्न करत आहे. या कार्याची दखल घेऊन यांना सुद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा सेवारत्न पुरस्कार २०२३ मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल परभणी जिल्ह्यातुन त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या