🌟शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची फौज मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी मुंबईकडे रवाना....?


🌟आज घेणार मंत्रालयाचा ताबा,शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच🌟


🌟सरकारकडून शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदान तोफ ओळखले जाणारे तुपकरांना चर्चेचे आमंत्रण🌟

🌟सरकार सोबत चर्चा करू...तोडगा न निघाल्यास शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतीलच - शेतकरी नेते रविकांत तुपकर


बुलढाणा  : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी मंत्रालयाचा ताबा घेण्याचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन ते आज २८ नोव्हेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत.  दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस असून अन्नत्याग सुरूच आहे.  सरकार व पोलिसांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यावा, आमची अडवा आडवी करू नये अन्यथा रक्ताचे पाट वाहतील असा गंभीर इशारा शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

           येलो मोझॅक, बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रु. सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीनला प्रति क्वि. किमान ९ हजार व कापसाला किमान १२,५०० रु. भाव मिळवा, चालू वर्षाची पिकविम्याची अग्रिम व १०० टक्के पिकविमा भरपाई मिळावी, दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत अदा करावी यासह सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांची फौज एकवटली आहे. मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी ही फौज मुंबईकडे निघाली आहे. २५ नोव्हेंबर पासून सोमठाणा येथे शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. आज अन्नत्यागचा चौथा दिवस असून त्यांचे हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान आज २८ नोव्हेंबर रोजी  पहाटेपासून शेतकऱ्यांनी खचाखच भरलेली वाहने सोमठाणा येथे दाखल होत होती.  शेतकऱ्यांची फौज आणि वाहनांचा ताफा घेऊन शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर सोमठाणा येथून बुलढाणा कडे निघाले.  बुलढाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटर समोर देखील सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी जमा होत होती. वाहनांच्या रांगा लागल्या हॊत्या.  बुलढाणा येथे सर्व शेतकरी एकत्र झाले. यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. `कोण आला रे कोण आला शेतकऱ्यांचा वाघ आला´....  शेतकरी एकजूटीचा विजय असो...भीक नको हवे घामाचे दाम... अशी प्रचंड घोषणाबाजी करत शेतकऱ्यांची फौज आणि वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. पोलिसांनी सर्वत्र तगडा बंदोबस्त लावलेला हॊता.  सोयाबीन-कापसाला भाव मागणे, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणे हा गुन्हा ठरत नाही, तो आमचा हक्क आहे. त्यामुळे पोलिसांनी आडवावी करू नये. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.  शेतकरी आधीच संतप्त आहेत त्यामुळे कोणतीही आक्रमक भूमिका शेतकरी घेऊ शकतात.  आम्हाला संयम तोडायला लावू नका अन्यथा रक्ताचे पाट वाहतील, असा गंभीर इशारा शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी दिला आहे.  स्वाईमानी हेल्पलाईन सेंटर समोरून हा ताफा मुंबईकडे रवाना झाला. शंभरहून अधिक वाहनांचा हा ताफा शहरवासी यांचे लक्ष वेधून घेत होता. स्टेट बँक चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक,धाड नाका यामागे शहरातून फिरून शेतकऱ्यांचे फौज आणि वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. रस्त्याने ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर व समस्त आंदोलक शेतकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  आंदोलनात सहभागी सर्व शेतकरी महिला तरुण यांच्या चहा पाण्याची व्यवस्था देखील गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी केली होती. रविकांत तुपकरांचे स्वागत करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक रस्त्याने उभे होते. कुठे फटाके फोडून तर कुठे प्रचंड घोषणाबाजी करून या शेतकऱ्यांच्या फौजेचे स्वागत करण्यात आले. ज्या गावातून ही होत समोर जात होती त्या गावातील दोन-चार वाहने यात आपणहून सहभागी होत होते. त्यामुळे वाहनांची लांबच लांब रांग रस्त्याने दिसून येत होती.

* आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत, वेळ पडली तर आम्ही तुमच्यासाठी मुंबईला येवू....!

* मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांचा रविकांत तुपकरांना फोन * 

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशा अवस्थेतही त्यांनी  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली.  जीवाची पर्वा न करता तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे म्हणत  मनोज जरांगे पाटील यांनी रविकांत तुपकर यांच्याही आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. सोबतच प्रकृतीची काळजी घ्या,असा सल्लाही जरांगे पाटील यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांना दिला.

* राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकरांना चर्चेचे आमंत्रण...

* आम्ही सरकार सोबत चर्चा करू...तोडगा न निघाल्यास शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतीलच - रविकांत तुपकर

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना चर्चेचा निमंत्रण दिलं आहे. उद्या २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे निघाले असता जांब येथे शेतकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व सर्व आंदोलकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी विंचनकर, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, चिखली ठाणेदार संग्राम पाटील, धाड ठाणेदार मनोज गावंडे  यांनी  रविकांत तुपकरांची भेट घेऊन  शासनाच्या वतीने चर्चेचे लेखी निमंत्रणाचे पत्र दिले. आपण चर्चेस तयार आहोत. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, त्यानंतर आपण आपले आंदोलनाची भूमिका करणार आहोत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेतीलच व माझे अन्नत्याग ही चालू राहील, असे शेतकऱ्यांचे आग्यामोहळ व शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी प्रशासन व सरकारला कळविले. त्यांनतर शेतकऱ्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.

* शेतकरी नेते रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली कोणत्याही क्षणी अत्यावस्थ होण्याची शक्यता

रविकांत तुपकर यांनी २५ नोव्हेंबर पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.  गेल्या चार दिवसापासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. आपला अन्नत्यागाचे आंदोलन सुरू ठेवूनच ते मुंबईकडे निघाले आहेत.  दरम्यान त्यांचे प्रकृती बरीच खालावली आहे.  शुगर व ब्लड प्रेशर लेवल कमी झाली असून त्याचा किडनीवर देखील परिणाम झाला आहे. कमालीचा अशक्तपणा आलेला आहे, त्यामुळे उपचार घ्यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला, मात्र रविकांत तूपकरांनी उपचारास नकार दिला असून ते आपल्या अन्नत्यागाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जीव गेला तरी चालेल पण आता निर्णय झाल्याशिवाय माघार नाही असे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सांगितले आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या