🌟पुर्णेतील बुद्ध विहार म्हणजे आदर्श धम्म संस्कार केंद्र.......!


🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.३० नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल बुधवार दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी पुर्णेतील बुद्ध विहाराला भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार माधवराव बोथीकर,नगरपालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार कामा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पुंज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो व भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुद्ध विहार समितीच्या वतीने थायलंड येथील बुद्धमूर्ती,शाल,पुष्पहार, विहार स्मरणिका,स्मृतिचिन्ह देऊन जिल्हाधिकारी गावडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी बुद्ध विहाराच्या विकास कामाची माहिती दिली.

यावेळी सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की पुर्णा शहरातील बुद्ध विहार एक आदर्श धम्म संस्कार केंद्र आहे.येथे कमालीची स्वच्छता, शांतता,पावित्र्य पहावयास मिळाले. बुद्धविहारामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यावेळी त्यांनी पाहणी केली.विहारामार्फत चालविले जाणारे भदंत उपाली थेरो वाचनालय व ग्रंथालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका यांची पाहणी केली.

या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.भदंत पयावंश यांनी अभ्यासिकेच्या गौरवशाली वाटचालीचा परिचय करून दिला.भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी पादचारी  पूलाची अनेक वर्षापासूनची मागणी व त्याची आवश्यकता याविषयी याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली.रेल्वे प्रशासन व नगरपालिका यामध्ये समन्वय साधून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू अशाप्रकारे त्यांनी आश्वस्त केले.बोधिसत्व डॉ. बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती च्या वतीने फूट ओव्हर ब्रिज, ग्रंथालयाची जागा, विहारा साठी स्वतंत्र  रस्ता, 31 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी, विहाराच्या विकासकामांचा निधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सभोवती असलेलं अतिक्रमण, या व इतर कामाचा आढावा घेतला.

बुद्ध विहारांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे,माजी उपनगराध्यक्ष उत्तमभैया खंदारे,नगरसेवक अनिल खर्गखराटे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड,ॲड.धम्मदीप जोंधळे,मधुकर गायकवाड,मुकुंद भोळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड,सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड,इंजी.पी.जी.रणवीर,मिलिंद कांबळे,गौतम भोळे,वा.रा.काळे, टी.झेड.कांबळे,शिवाजी थोरात,मुकुंद पाटील व धम्म सेवेमध्ये करत असलेल्या महिला मंडळाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबराव सोनवणे,राहुल धबाले,अतुल गवळी,किशोर ढाकरगे,उमेश बारहाटे,सुरज जोंधळे,राम भालेराव ,राजू जोंधळे, आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या