🌟पुर्णा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मौ.फुकटगाव येथील शेतकऱ्याचा तिन एक्कर पेरूचा बाग उध्वस्त....!


🌟शेतातील जवळपास १० टन पेरूसह झाड देखील झाली उध्वस्त🌟 


पुर्णा (दि.२९ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यात दि.२७ नोव्हेंबर व २८ नोव्हेंबर २०२३ रोजी वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील गहू ज्वारी हरभरा मका आदी पिकांसह बागायती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.


तालुक्यातील मौजे फुकटगाव येथील बागायतदार शेतकरी हनुमान सोपानराव बोकारे यांच्या फुकटगाव शिवारातील गट नंबर ०७ या गटातील ०१.हे २० आर या क्षेत्रात त्यांनी तैवान पिंक या जातीचा पेरू फळाने १८०० झाडें लावलेले असून ही पएरउचई झाडे दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्णतः पाण्याखाली बुडाली  वादळीवाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे या बागेतील सर्व झाडें मोडली आहेत त्यामुळे या शेतकऱ्याला अक्षरशः रक्ताश्रू ढाळण्याची वेळ आली असतांना महसूल प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेचं सोंग घेऊन बसल्याचे निदर्शनास येत आहे महसूल प्रशासनाने शेतकरी हनुमान बोकारे यांच्या नुकसान झालेल्या पेरूच्या बागाचा तात्काळ पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. 

फुकटगाव येथील शेतकरी हनुमान बोकारे यांनी लागवड पेरू बागायती पिकाची लागवड दोन वर्षांपूर्वी एमआरजीएस पंचायत समिती पुर्णा मार्फत केली असून पुर्ण झाडें असून देखील त्यांना या योजेनेतून रोपाचे सुद्धा पैसे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत सरकारने कुशल पण अजून दिले नाहीत त्याची देखील चौकशी करून प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकरी. हनुमान सोपानराव बोकारे यांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या