🌟परभणी जिल्ह्यातील समाजभूषण उत्तम खंदारे यांची निरपेक्ष समाजसेवा उल्लेखनीय...!


 🌟प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे यांचे प्रतिपादन🌟

सम्यक समाज संघ लातूर यांच्यावतीने सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनिय व्यक्तिमत्त्वाचा गौरव संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संविधान गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला.लातूर येथे भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता पार पडलेल्या या  समारंभामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी सांभाळून निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या  करणाऱ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार व मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ  सुरेश वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील सुप्रसिद्ध विधी तज्ञ एडवोकेट मनोहरराव गोमारे एडवोकेट मंचकराव डोणे सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण प्रकाशन समितीचे सचिव डॉ प्रदीप आगलावे डॉ. वेद प्रकाश मलावडे आदींची उपस्थिती होती आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी पूर्णा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे यांचं आंबेडकर व धम्म चळवळीतील निरपेक्ष योगदान राजकारणाला आदर्श धम्मकारणाची जोड देऊन त्यांनी समाज हिताची कामे मोठ्या प्रमाणावर केली.

पूर्णा या ठिकाणी गेल्या दोन दशकापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन सोहळा तथागत मित्र मंडळाच्या माध्यमातून अतिशय भव्य प्रमाणात साजरा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते नामांतर शहीद पॅंथर गौतम वाघमारे जनार्धन मवाडे यांच्या वारसांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा यथोचित सन्मान ते करत असतात.

नामांतर लढ्यातील अग्रणी सुप्रसिद्ध विचारवंत उच्चपदस्थ अधिकारी यांना या कार्यक्रमांमध्ये बोलावून आंबेडकरी समाजाचा प्रबोधन करण्याचे काम सातत्याने त्यांच्याकडून होत असते.त्यांची जन्मभूमी हिंगोली जिल्ह्यामधील वाई गोरक्षनाथ व कर्मभूमी पूर्णा या ठिकाणी सांची स्तूपाची प्रतिकृतीचे अतिशय भव्य व दिव्य प्रवेशद्वार त्यांनी शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता स्वतः निर्माण केले.

पूर्णा शहरामध्ये सामाजिक सदभाव एकता व अखंडता प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या या निरपेक्ष कार्याबद्दल त्यांना सम्यक समाज या संस्थेचा राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात येत आहे.अशा प्रकारचे गौरवपूर्ण उदगार त्यांनी काढले.या भावपूर्ण सोहळ्यास महाराष्ट्र मधून सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या