🌟परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन...!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची या रॅलीला प्रमुख उपस्थिती राहणार🌟

परभणी (दि. 25 नोव्हेंबर) : जिल्हा रुग्णालय परभणी यांच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त शुक्रवार दि.1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा रुग्णालय येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची या रॅलीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जागतिक एड्स दिनानिमित्त शुक्रवार, दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा रुग्णालयापासून, सुभाष रोड, पुढे शिवाजी चौक, नानलपेठ रोड, शनि मंदीर रोड, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय येथे प्रभात फेरीचा समारोप होणार आहे. या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लखमवार यांनी केले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या