🌟परभणी जिल्ह्यातील दैठणा-गंगाखेड रोडवर बस-ॲटोचा भिषण अपघात : एकाचा मृत्यू.....!


🌟दैठणा-गंगाखेड रोडवरील इंद्रायणी पुलाजवळील घटना🌟

परभणी (दि.२७ नोव्हेंबर) - परभणी जिल्ह्यातील दैठणा-गंदैठणा-गंगाखेड रोडवरील इंद्रायणी पुलाजवळ शनिवार दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा व ॲटोचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली होती या भयंकर अपघातात ॲटोतील भरत कऱ्हाळे वय ३५ वर्षे राहणार गौडगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटने संदर्भात पोलीस प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की शनिवारी सायंकाळच्या सुमारास गंगाखेड कडून परभणीकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम.एच.०८ एपी ५९०२ या क्रमांकाची बस व दैठण्याहून गंगाखेडकडे जात असलेल्या एम.एच २३ एच ९२०३ या क्रमांकाच्या ॲटोमध्ये इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ भिषण अपघात झाला या भिषण अपघातात ॲटोतील भरत कऱ्हाळे यांचा जागीच मृत्यु झाला महामार्गावर गस्तीवर असलेल्या महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळ पंचणामा करुन मयताचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या