🌟शिक्षकांच्या न्याय हक्का साठी लढणार समर्थ नेतृत्व डि.सी.डुकरे सर...!


🌟शिक्षकाचे व्यथा वेदना शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देन्या साठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून त्यांचे अनुदानाचे प्रश्न त्यांनी सोडवले.🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - लेखक : श्रीकांत हिवाळे सर

राष्ट्रमाता इंदिरागांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी चे मुख्य ध्यापक डी. सी.डुकरे सर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कंसाठी लढणार समर्थ नेतृत्व म्हणून सुपरिचित आहेत.मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत आदरणीय पी.जी.दस्तुर कर सर यांच्या तालमीत तयार झालेले डुकरे सर दस्तुर कर सरांचे कडवे समर्थक म्हणून त्यांची ओळख.गेल्या तीन दशकांपासून शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम निरपेक्षपणे ते करत असतात.विनाअनुदानित शिक्षकाचे व्यथा वेदना शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देन्या साठी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून त्यांचे अनुदानाचे प्रश्न त्यांनी सोडवले.

प्रत्येक कर्मचाऱ्याला सर्व्हिस बुक ची एक कॉपी त्यांच्या कडे असली पाहिजे त्या साठी त्यांनी पाठ पुरावा करून त्यांच्या प्रयत्नाला यश आले.आज प्रत्येक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडे सर्व्हिस बुक ची दुय्यम प्रत आहे.या मुळे त्यांना सेवा शा श्र्वावतीची हमी मिळाली.तत्कालीन शिक्षण उपसंचालक आदरणीय एम.आर.देशमुख साहेब यांनी या बाबत शिक्षण विभागाकडे पाठ पुरावा केल्या बद्दल त्यांचे कौतुक केले होते.शिक्षकांना ज्ञान दानाचे काम निर्भय पने करता यावे तो तणाव मुक्त असला पाहिजे त्यांचे पगार महिन्याच्या 1 तारखेलाच झाले पाहिजे या साठी त्यांनी शासन दरबारी शिक्षण विभागा कडे पाठ पुरावा केला या बाबतही त्यांना यश आले.

वेतन आयोगाचे थकबाकी हप्ते मिळण्या साठी माननीय शिक्षण साचिव माननिय शिक्षण संचालक यांच्या कडे वेळोवेळी फोन वर निवेदनाद्वारे मागणी केली या प्रयत्नाला सुद्धा त्यांना यश आले आहे.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून झाले पाहिजे या साठी त्यांचा सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे त्यांचा हा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.डुकरे सरांच शिक्षण क्षेत्रातील समर्पित योगदान काळाच्या कसोटीला उतरले आहे.

शिक्षक नेते डी.सी.डुकरे हे उत्तम संवेदनशील कवी सुद्धा आहेत.त्यांची धाराशिव,मुरूड, उंडणगाव,नायगाव,पैठण,शिरूर ताजबंद, नांदेड येथील मराठवाडा साहित्य सम्मेलनात निमंत्रितांच्या कवीसम्मेलनात हजारो रसिकांसमोर कविता सादर झाली आहे.त्यांचा वैशाखवणवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी फ.मुं.शिदे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या वैशाखवणवा काव्यसंग्रहास बीरसा मुंडा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. शिक्षक नेते डी.सी.डुकरे हे केवळ कॅमेर्‍या समोरील नेते नसून ते इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक असून राज्य पातळीवर त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. इंग्रजी विषय शिक्षकांसह महाराष्ट्रातील त्यांचा पन्नास एक हजार चाहता शिक्षक, प्राध्यापक वर्ग आहे. 

इंग्लिश टिचर्स असोशियन जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे.2018 ला मधल्या मार्गाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार भलत्याच मार्गाने भरकटत गेला.इथेही शिक्षक नेते डी.सी.डुकरे यांच्यावर अन्याय झालाय हे अनेक शिक्षक, प्राध्यापकांना ज्ञात आहे. शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं भरीव कार्य होते एवढेच नव्हे तर मराठवाडा विभागात शिक्षक परिषदेवर शिक्षक,प्राध्यापकांचा जो विस्वास निर्माण झाला ते शिक्षक परिषदेला डी.सी.डुकरे सारख उत्तम, आदर्श,धाडसी,त्यागी नेतृत्व मिळाले होते म्हणुनच आणि  2017 च्या मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीतील शिक्षक परिषदेचे उमेदवार प्रा. सतिश पत्की यांच्या मराठवाडा प्राचार प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा हजारो शिक्षकांच्या उपस्थित शिक्षक परिषदेने केली होती.तरीही या शिक्षक नेत्यास शिक्षक परिषदेने 2023 मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत उमेदवारी दिली नाही उलट बाहेरून उमेदवार आयात करून उमेदवारी दिली हा त्यांच्यावर झालेला घोर अन्याय राज्यातील शिक्षक, प्राध्यापक कदापि विसरणार  नाहीत.तरीपण 

 शिक्षक नेते डी.सी.सरांच शिक्षक चळवळीतील कार्य जोमाने सुरू आहे.सर्व प्रकारच्या विकारापासून व्यसनं पासून कोसो दूर ते आहेत.अशा त्याग सेवा समर्पण अंगी असलेल्या शिक्षक नेते डी.सी.डुकरे यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....!

✍🏻श्रीकांत हिवाळे सर

सेवानिवृत्त शिक्षक राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी जी.परभनी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या