🌟पुर्णेतील बुद्ध विहारात वर्षा वास समारोपासह संघदान धम्म देशना व सत्कार समारंभाचे आयोजन...!


🌟सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम संपन्न🌟 

पुर्णा (दि.३० ऑक्टोबर) - पुर्णा येथील बुद्ध विहारात उद्या मंगळवार दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजता अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महा थेरो व पूज्य भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली ४२ वा वर्षा वास संपन्न करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे असणार असून प्रमुख धम्म देशना पूजनीय भिक्कु संघाच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी मा.रघुनाथ गावडे,अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती महाराष्ट्रचे अध्यक्ष मा.सिद्धार्थ हत्तींहंम्बीरे,गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर,पुर्णा तहसिलचे तहसिलदार माधवराव बोथीकर,सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीचे कार्यकारी अभियंता एम.एस.पाटील,समाज कल्याण विभाग परभणीच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे,डॉ.अनंत सूर्यवंशी नांदेड,कास्टट्राइब संघटनाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सतीश कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्धविहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका व परभणी दक्षिण जिल्हा शाखा धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या