🌟सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी आज दि.०४ ऑक्टोंबर रोजी पुर्णा तहसिल कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा....!

 


🌟या ट्रॅक्टर मोर्चात तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केले आले🌟

पुर्णा (दि.०४ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव,आहेरवाडी, नावकी ,पिंपळगाव (बा), कौडगाव, वडगाव,  सुरवाडी, आदि गावातील ग्रामस्थ अंतरवाली सराटी  जालना येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावे  यासाठी तसेच न्याय आणि हक्काची आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आता सर्वांनी एकजुटीने मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळींनी आज दि.०४ रोजी  गावातील ट्रॅक्टर घेऊन पूर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत या ट्रॅक्टर मोर्चात तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या