🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी 78 दिवसांसाठी प्रोडक्टिव्हिटी बोनस देण्यास मोदींच्या कॅबिनेटची मंजुरी🌟

* ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या

* 'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं', ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट

* तो आला, तो थांबला, सगळी गणितं जुळवून गेला, ललित पाटील विषयी नाशिक पोलिसांना थांगपत्ताच नाही, कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर भाजप अधिकाऱ्याकडून पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

* आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात,त्यामुळे मिळवणारच; मनोज जरांगे पाटील

* कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचा दावा

* ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ; देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

* पाच राज्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीचे दोन्ही गट लढवणार नाहीत, चिन्हाचा वाद होऊन ते गोठू नये यासाठी निर्णय

* रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 78 दिवसांसाठी प्रोडक्टिव्हिटी बोनस देण्यास मोदींच्या कॅबिनेटची मंजुरी

* धनगर समाजाच्या आरक्षणाचा पहिला फटका बारामतीला बसणार ; धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा गौप्स्पोट

* मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

* ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणाला सोडणार नाही ; तपासानंतर अनेकांचे तोंडं बंद होतील ; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

* मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतर आता थेट पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा होणार ; 20 ऑक्टोबरला खेडची सभा झाल्यानंतर बारामतीत सभा घेणार

* गाझातील अल-अहली रुग्णालयात भीषण स्फोट ; या स्फोटात तब्बल 500 जणांचा मृत्यू

* मराठा-कुणबीसाठी सरसकट ऐवजी जुन्या नोंदीवर प्रमाणपत्र ओबीसींसोबतच्या बैठकीचे इतिवृत्त अखेर जाहीर

* दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपुत प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून उच्च न्यायालयात कव्हेट दाखल

* राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पाशा पटेल यांची नियुक्ती

*हृदयद्रावक तामिळनाडूतील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट ; 11 जणांचा होरपळून मृत्यू

* Jio Finance ची पर्सनल लोन सेगमेंटमध्ये एन्ट्री,लवकरच अन्य प्रकारची कर्जही मिळणार

✖️ एलॉन मस्कची मोठी घोषणा,आता X वापरायचं असेल तर सर्वांना द्यावे लागणार पैसे

* मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुल अपघातात अजित पवार गटाच्या आमदाराला दुखापत

* नाशिक मधून १५० कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणी १५ वा आरोपी ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

* ऑनलाईन गेमिंगमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला नशीब उजळलं पण हा आनंद जास्त वेळ टिकला नाही.पिंपरी चिंचवडमधील PSI सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे.

* फुटबॉलचा जादूगार रोनाल्डिन्होचे भारतात आगमन, कोलकातामध्ये केली दुर्गापूजा भारतात क्रिकेट वर्ल्डकप आणि नवरात्रीची धामधूम असतानाच रविवारी ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो कोलकातामध्ये पोहचला आहे.

* पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्ये प्रकरणात 15 वर्षांहून अधिक काळानंतर दिल्ली न्यायालयाने आज म्हणजेच बुधवारी 5 जणांना हत्या,दरोडा आणि मकोका अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आहे

* केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.

 *याच पार्श्वभूमीवर आता सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी, अर्थात किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. कॅबिनेटने MSP मध्ये 2% ते 7% पर्यंतची वाढ करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

* कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेलं राज्य शासनाचे कस्तुरबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळखात

* सांगलीचे जिल्हाधिकारी धावले मदतीला,पोते उचलून केली मजुरांची मदत

* मरेपर्यंत भाजपसोबत जायचे नाही ---- शरद पवार

* महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे सत्तेत व विरोधात एकच पक्ष ---- राज ठाकरे  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या