🌟शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या....!


🌟या दुर्दैवी घटनेनं बिड जिल्ह्यात उडाली खळबळ🌟

बिड (दि.२१ ऑक्टोंबर) - शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख दिवंगत लोकनेते विनायक मेटेंच्या पुतण्याचं टोकाचं पाऊल उचलत आपल्या राहात्या घरी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं असल्याची बातमी बिड येथून समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण बिड जिल्ह्यात घटनेनं खळबळ उडाली आहे.

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. घटनेनं खळबळ उडाली आहे. दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे वय वर्षे ३४ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. बीडच्या राजेगाव परिसरात ही घटना घडली आहे सचिन त्रिंबक मेटे असं विनायक मेटे यांच्या या पुतण्याचं नाव आहे सचिन यांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या