🌟वाशिम येथील ३५ वर्षीय महिलेला तातडीच्या किडनी प्रत्यारोपणासाठी दानदात्याची प्रतिक्षा...!


🌟दानशुरांनी पुढे येण्याची गरज : महिलेला मिळू शकेल जिवनदान🌟

फुलचंद भगत

वाशिम - शहरातील शुक्रवारपेठ भागातील अत्यंत गरीब परिस्थितीतील असलेल्या सौ. वनमाला घनशाम खिराडे या ३५ वर्षीय महिलेच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून सद्यस्थितीत ही महिला डायलेसिसवर आहे. डॉक्टरांनी सदर महिलेवर तातडीने किडनी प्रत्यारोपण करणे हाच एकमेव जीवन वाचविण्याचा उपाय सांगीतला आहे. त्या अनुषंगाने या महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी दानदात्याची प्रतिज्ञा असून दानशुरांनी पुढे आल्यास या महिलेला जीवनदान मिळू शकते.

  अधिक माहिती अशी की, शहरातील शुक्रवारपेठ भागातील राजनी चौक परिसरात राहणारे व शेतमजुरी करणारे चांभार समाजाचे विठ्ठल इंगळे यांची मुलगी वनमाला हिचा विवाह मंगरुळपीर येथील मजुरदार घनशाम खिराडे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर वनमाला हिला एक मुलगी व दोन मुले आहेत. सद्यस्थितीत तिची मुलगी लग्नाला आली आहे. गेल्या वर्षभरापासून वनमाला हिला किडणीचा त्रास होत होता. व त्यावर उपचार सुरु होते. मात्र दोन महिन्याआधी त्रास खुप वाढल्यानंतर वडील विठ्ठल इंगळे यांनी तिला मुंबई येथील शासकीय मेडीकल कॉलेजमध्ये दाखविले. तेथे सर्व चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी वनमाला हिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून एका किडनीचे प्रत्यारोपण केल्यास तीचा जीव वाचु शकते असे सांगीतले. त्यामुळे वडील विठ्ठल इंगळे यांना मुलीचा जीव वाचविण्यासाठी दानदात्याची प्रतिक्षा आहे. सदर महिलेचा जीव वाचविण्यासाठी दानशुरांनी पुढे यावे असे आवाहन इंगळे परिवाराने केले आहे. दानशुरांनी कुणाल खिराडे (७२१८१४३२२३) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या