🌟पुर्णेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध...!


🌟तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन केली होती लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभुल

🌟असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) ऋषिकेश सकनूर यांनी म्हटले🌟 

पुर्णा : कंत्राटी भरतीचा निर्णय घेऊन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले होते सदरील दिशाभूल करणारी कंत्राटी भरती रद्द करून तरुणांची फसवणूक रोखणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व काँग्रेस ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी शरद पवार गट पक्ष्याचा निषेध नोंदवण्यासाठी दिनांक २१ आँक्टोबर रोजी भाजपा पूर्णा तालुक्याच्या वतीने पुर्णा येथील झिरो फाटा टी पॉईंट जवळ सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी ,तालुका पदाधिकारी ,मोर्चा आघाड्यांचे पदाधिकारी सर्व मोर्चा ,सर्व प्रकोष्ट पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या  उपस्थितीत महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष(ग्रामीण) ऋषिकेश सकनुर, जिल्हा उपाध्यक्ष बळीरामजी कदम , जिल्हा चिटणीस भारत एकलारे,  तालुका अध्यक्ष नरहरी ढोणे, माजी तालुका अध्यक्ष अनंतराव पारवे, तालुका सरचिटणीस गोपाळ आंबोरे , तालुका सरचिटणीस राम चापके,  सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कैलास बुचाले, तालुका उपाध्यक्ष भागवत देसाई, कैलास सवराते, उद्धव मोरे,निवृत्ती बोकारे,पुर्णा शहर अध्यक्ष प्रशांत कापसे ,अजय ठाकूर ,सुनील डुबेवार ,राम पुरी ,तालुका चिटणीस भीमाशंकर शिराळे, रावजी हेडगे ,सचिन भोसले , ताडकळस शहराध्यक्ष शहराध्यक्ष मनु पाटील आंबोरे ,अतुल भुसणारे ,शिवकुमार शिराळे यांच्यासह आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या