🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन..!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले🌟

परभणी (दि.०७ सप्टेंबर २०२३) :  स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. 

अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या