🌟नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात मराठा आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास...!


🌟मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सुदर्शन देवराये या तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या🌟

नांदेड (दि.१८ सप्टेंबर २०२३) - मराठवाड्यात काल रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी सर्वत्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असतांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सुदर्शन देवराये या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्र  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत असून महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या याकरिता आक्रमक झालेला मराठा समाज लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करीत असून मराठा समाजाला  राज्य सरकारणे तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी केली जात आहे अशातच नांदेड जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक हृदयविदारक घटना समोर आली आहे नांदेडमध्ये मराठा आंदोलनासाठी बसलेल्या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात काल रविवार दि.१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशीच दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सुदर्शन देवराये असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने सुदर्शनने आत्महत्या केली आहे, असा दावा कामारी गावातील गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान या घटनेनंतर कामारी गावातील मराठा आंदोलनाच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. याशिवाय सुदर्शन देवराये याचेही फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीत कायम अग्रेसर असणाऱ्या बिड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे नामक व्यक्तीने गळफास लाऊन आत्महत्या केली होती आरक्षणासाठी आयोजित चक्काजाम आंदोलनाच्या धामधुमीवेळीच गोविंद यांनी गळफास घेतला होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या