🌟पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत खेळत आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व्यवस्थेशी जिवघेणा खेळ...!


🌟गौर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर घाणीच्या विळख्यात🌟 


पुर्णा (दि.१८ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात हळुवारपणे मलेरीया,डेग्यू सारख्या साथीच्या जिवघेण्या आजारांनी प्रवेश केल्याचे निदर्शनास येत असतांना ग्रामीण भागातील ग्रामपंचायत प्रशासनांसह आरोग्य प्रशासन देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याऐवजी निद्रीस्त असल्याचे निदर्शनास येत असून पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी व अकार्यक्षम उजागर करणारी घटना उघडकीस आली असून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरासरासह गावातील अंगणवाडी परिसर तसेच नागरी वसाहतींतील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामूळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत असून काल रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांस ध्वज संचलनावेळी शाळेतील विद्यार्थी/विद्यार्थींसह शिक्षक/शिक्षिका व कर्मचाऱ्यांना या अस्वच्छतेचा फटका बसला. 


 गौर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांचा कारभार उंटावरून शेळ्या हाकल्यागत झाल्याचे दिसत असून त्या नांदेड येथून अपडाऊन करीत असून ग्रामपंचायत कार्यालयात महिन्यातून दोन/चार वेळेस हजेरी लावत असल्यामूळे प्रशासकीय कारभार ढेपाळल्याचे दिसत असून गावातील स्वच्छतेसह आरोग्य व्यवस्था पाणीपुरवठा व्यवस्था संपूर्णपणे कोलमडल्याचे निदर्शनास येत असून गावासह शाळा/अंगणवाडी परिसरात घाणीचे सामाज्य पसरले असून स्वच्छते अभावी नाल्या देखील तुंबल्यामुळे प्रचंड दुर्गंधीसह डासांचे प्रमाण देखील वाढल्यामुळे मलेरीया/डायफाईड/डेंग्यू सारख्या जिवघेण्या आजारांची साथ फैलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गौर जिल्हा परिषद शाळेसह अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थींनीची आरोग्य व्यवस्था धोक्यात आली असून गौर ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे सपशेल दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जिवघेणाखेळ खेळतांना पाहावयास मिळत असून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तर अक्षरशः नाल्यातील अस्वच्छ पाणी साचत असून शाळेच्या प्रांगणात शाळेच्या जुन्या मोडकळीस आलेल्या पाडलेल्या खोल्यांचे मटेरीयल जागेवरच पडून असल्यामुळे या ठिकाणी विंचू/साप देखील निघत असल्याचे समजते परंतु ग्रामपंचायत प्रशासन शाळेच्या प्रांगणाच्या स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह जिवितास धोका झाल्यास यास सर्वस्वी ग्रामविकास अधिकारी लाढेकर व सपंच/सरपंच हेच जवाबदार राहतील असे पालकवर्गातून बोलले जात असून या संदर्भात पंचायत समितीचे बिडीओ व बिओ यांना गौर गावातील जागृक नागरीकांनी अनेकवेळा सुचित करून देखील संबंधित अधिकारी ही या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे .....  


     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या