🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पत्रकार सुड प्रकरणाची जिल्हा प्रशासन निष्पक्षपातीपणे चौकशी करणार काय ?


🌟लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकाचे अशा प्रकारचे वर्तन हे संवैधानिक तरतुदीचा उल्लंघन करणारे🌟


पुर्णा (दि.०७ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातल्या ताडकळस व परिसरातील जनतेच्या प्रश्नास निस्वार्थ व निर्भीडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या बातमीचा राग मनात धरून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या ताडकळस ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी यासाठी पत्रकार फिरोज मुनवर पठाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले ताडकळस गाव हे पूर्णा तालुक्यातील बाजारपेठेचे मोठे केंद्र आहे परंतु विस्तार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून या गावचा विकास हा खुंटलेला आहे गावच्या विकासासाठी आलेला निधी स्थानिक पुढार्‍यांनी नेमका वापरला कुठे हा संशोधनाचा विषय आहे ताडकळस येथील जनता नागरी सुविधांसाठी ग्रामपंचायत इकडे कर भरणा करत असताना देखील त्या सुविधा वेळेवर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःच्या धोरणात बदल घडवणाऱ्या सरपंचाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून वार्तांकन केले असता सरपंच उपसरपंच यांनी राग मनात धरून जाणीवपूर्वक पत्रकार फिरोज मुनवर पठाण व त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष केले पठाण यांच्या घरासमोर रस्त्यावर झालेले खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेल्या मुरूम सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सांगण्यावरून जेसीबीने उचलण्यात आला लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकाचे अशा प्रकारचे वर्तन हे संवैधानिक तरतुदीचा उल्लंघन करणारे आहे,

सर्वसामान्यांप्रती आत्मियता ठेवून नम्रतापूर्वक कार्य करण्याची तत्व प्रणाली ही पदावरील व्यक्ती असली पाहिजे असे असताना सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी पठाण यांच्या बाबतीत ताडकळस येथे हुकूमशाहीचे दर्शन घडवले या हुकूमशाही प्रवृत्ती बद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली आहे प्रशासनाकडून देखील या पदाधिकाऱ्यांना अभय मिळत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फिरोज मूनवर पठाण यांनी लाक्षणिक उपोषण केले सदरील उपोषणास स्थगिती द्यावी म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद परभणी यांनी पंचायत समिती पूर्णा व ग्रामपंचायत ताडकळस यांच्या नावे पत्र काढून प्रकरणात जाय मोक्यावर भेट देऊन तक्रारीत नमूद मुद्दे बाबत वस्तू तिची चौकशी अहवाल सात दिवसाच्या आत कार्यवाहीचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले या पदाधिकाऱ्यांवर चौकशी कारवाई न झाल्यास मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे व सर्व पत्रकार संघटनेने आणखी तीव्र स्वरूपाचे ऊपोषण व आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या