🌟मराठा आंदोलनाची धग पाथरी तालुक्याच्या गावागावात....!


🌟मराठा समाजाला कुनबी दाखले देणे सुरू होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहाणार🌟

प्रतिनिधी

पाथरी (दि.०८ सप्टेंबर २०२३) :- मराठा आरक्षण मिळवण्या साठी अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथील उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्या साठी आता पाथरी तालुक्यात आंदोलनाची धग पोहचली असुन शालेय विद्यार्थ्यां सह गावागावातुन ग्रामस्थांनी उपोषणे सुरू केले आहेत.

अंबड तालुक्याती आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगष्टरोजी संविधानिक मार्गाने शांततेत उपोषण सुरू केल्या नंतर पोलीसांनी बळाचा वापर करत लहान मुले, महिला, वृद्ध , तरुणांना बेदम मारहान करत गोळीबार केल्या नंतर या आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पसरली मारहाणीचा निषेध राज्यभर दिसुन आला यांत कडकडीत बंद ही पाळण्यात आले अजुन ही पडसाद उमटतच असतांना जो पर्यंत मराठवाड्यातील मराठ्यांना सरसगट कुनबी दाखले मिळत नाहित तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भुमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतल्या कारणाने या भुमिकेला पाठिंबा म्हणुन आता पाथरी तालुक्याच्या गावागावातुन सकल मराठा समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. वाघाळा गावात छत्रपती शिवरायांच्या स्मारका जवळ सरपंच बंटी पाटलांच्या नेतृत्वात सकल मराठा समाजा सह ग्रामस्थ प्रचंड घोषणा बाजी करत आंदोलन करत आहेत तर देवेगाव येथे पांडुरंग गलबे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असुन गोपेगावात ही या आंदलनाची धग दिसुन येत आहे. कासन्सुरकरांनी गावात बंद पाळून या पुर्वीच आंदोलनात सहभाग घेतला असुन कालपासुन सारोळा येथे आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाला कुनबी दाखले देणे सुरू होत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहाणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या