🌟वाहक व चालकांनी प्रसंगावधान राखत एस.टी.बसचे नुकसान वाचवल्या बद्दल त्यांचा सत्कार.....!


🌟परळी आगाराचे चारही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून आंदोलनकर्त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केलेली बस वाचवली🌟


परळी (प्रतिनिधी) :- दिनांक ०१.०९.२०२३ रोजी परळी ते मोहा बस क्र. एम.एच.२० बी.एल.०७७८ व अंबाजोगाई आगाराची अंबाजोगाई-मोहा बस क्र. एम. एच.१४ बी.टी.१७१५ वर कर्तव्य करणारे परळी आगाराचे चालक श्री दिनकर भागोजी चाटे चा.क्र.१८७६१ व वाहक श्री.माणिक सौदागर मुंडे वा.क्र.२६५७४ तसेच अंबाजोगाई आगाराचे चालक श्री.चंद्रकांत श्रीरंग नेहरकर चा.क्र.२०७२७ व वाहक श्री. देशमुख दत्तात्रे बालासाहेब वा.क्र.३०८२६ यांनी आपले नियोजित कर्तव्य करत असताना मोहा येथे रात्री वस्तीस गेले असता रात्री २३:१५ वाजता अज्ञात ८-१० लोकानी रा.प. बस वर दगड फेक केली व बस वर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला.अंबाजोगाई व परळी आगाराचे चारही कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून आंदोलन कर्त्यानी बस जाळण्याचा प्रयत्न करताना पाणी टाकून बस जाळण्या पासुन वाचविले व रा.प.बसचे होणारे मोठे नुकसान हानी टाळली या बद्दल परळी आगार प्रशासनाच्या वतीने आगार प्रमुख श्री.संतोष नागनाथ महाजन यांनी कर्मचा-यांचा सत्कार केला.सत्कार प्रंसगी आगाराचे सहा.कार्यशाळा अधिक्षक श्री.गर्कळ अमोल, वाहतुक निरीक्षक श्री. सोनवने, आगार लेखाकार श्री.चव्हाण तर कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.रमेश गित्ते व आगारातील कर्मचारी उपस्थीत होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या