🌟परभणी महानगर पालिकेच्या रखडलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरीत बांधकामासाठी आखणीन ११ कोटी ७५ लाख रुपये मंजूर...!


🌟बचत भवनाच्या जागेत नवीन नाट्यगृह निर्मितीकरीता काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते🌟

परभणी (दि.१६ सप्टेंबर २०२३) :  महानगरपालिकेच्या रखडलेल्या नाट्यगृहाच्या उर्वरीत बांधकामाकरीता राज्य मंत्रीमंडळाने ११ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

             बचत भवनाच्या जागेत नवीन नाट्यगृह निर्मितीकरीता काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात बांधकामही सुरु झाले. परंतु, हे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. त्यासाठी निधी कमी पडला. त्यामुळे या नाट्यगृह निर्मितीचे काम पूर्णतः रखडले होते. हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सातत्याने येनकेनप्रकारे आवाज उठविला. नाट्य कलावंत व रसिकांनीसुध्दा रोष व्यक्त केला. परंतु, सरकारने फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही. या पार्श्‍वभूमीवर हे नाट्यगृह तात्काळ सुरु व्हावे व रखडलेल्या कामांना दिशा मिळावी म्हणून राज्य सरकारने ११ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

           दरम्यान,नवीन नाट्यग्रहाच्या कामांसाठी एकूण खर्च २१ कोटी अपेक्षित होता. परंतु, त्या तुलनेत निधी मंजूर झाला नाही. उर्वरीत कामाकरीता निधी मिळावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली. परंतु, या संबंधीचा प्रस्ताव दुर्लक्षित राहीला. या नाट्यगृहात १ हजार प्रेक्षक बसण्याची जागा आहे, यात  एसीची व्यवस्था आहे तसेच अन्य सुविधाही आहेत. एकूण हे काम तातडीने पूर्ण होते अपेक्षित आहे. आता मंत्री मंडळ बैठकीतून त्यास आर्थिक तरतूद झाल्याने काम मार्गी लागेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या