🌟छ.संभाजी नगर (औरंगाबाद) रेल्वे स्थानकावर महिला प्रवासी यास हार्ट एटाक....!


🌟रेल्वे पोलिस अधिकारी/कर्मचारी व रेल्वे सेनेच्या सदस्यांनी तात्काळ उपचारकामी दवाखान्यात भर्ती केल्याने प्राण वाचले🌟

छ.संभाजी नगर (औरंगाबाद) - छ.संभाजी नगर (औ.बा.) जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील भिंगी बोरसर येथील महिला प्रवासी सौ.तारा चंद्रशेखर सातदिवे वय ३० वर्षे ही प्रवासी महिला रोटेगाव तेथुन छ संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे उतरून फुट ब्रीज वरुन खाली उतरत असताना छातीत चमक निघताच खाली पडल्याची आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी घडली.

या वेळी दिवसपाळीवर कार्यरत रेल्वे पोलीस स्थानकाचे पिएसआय. मिर्झा बेग,एएसआय. माधव दासरे,पो.कॉ.तान्हाजी चौरे,रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख आदींनी तातडीने स्वतःच्या खर्चाने रिक्षा मधुन उपचार कामी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले यावेळी उपस्थित उपचार करणाऱ्या डॉक्टर यांनी आपण जर आणखी थोडा वेळ लागला असता तर वाचवणे अवघड होते असे म्हणाले त्यांच्या वर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत घटनेची नातेवाईक यांना माहिती देण्यात आली आहे रेल्वे पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी तातडीने सेवा कार्यात सहभाग घेतला व विशेष रेल्वे पोलीस यांनी यावेळी रिक्षाचा खर्च देखील स्वतः केला त्यामुळे त्या महिला प्रवासीचे प्राण वाचले रेल्वे पोलिस अधिकारी/कर्मचारी व रेल्वे सेना सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या