🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अंतरवाली येथील घटनेचा सकल मराठा समाजाकडून मोर्चा काढून निषेध...!


🌟सकल मराठा समाजाच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन🌟


परभणी (दि.०२ सप्टेंबर २०२३) - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिला पुरुषांवर लाठी हल्ला करण्यात आला शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसह माता-भगिनींवर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान सकल मराठा समाजाच्या महिलांचा हस्ते मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजातील तरुण महिलांचा मोठा सहभाग होता यावेळी पोलीसांनी कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या