🌟पुर्णा तालुक्यातील नावकी येथे अंतरवाली घटनेच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन...!


🌟गावातील मुख्य रस्त्यावर सर्व स्त्री-पुरुष लहान बालके यांनी एकत्रित येऊन तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले🌟

पुर्णा (दि.०३ सप्टेंबर २०२३) - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यावर वृद्ध महिलांवर पोलिसांनी लाठीमार केलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज रविवार दि.०४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील नावकी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील मुख्य रस्त्यावर सर्व स्त्री-पुरुष लहान बालके यांनी एकत्रित येऊन तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा हल्ला करणारी पोलीस अधिकारी व पोलीस यांना निलंबित करा मराठा समाजावर झालेले गुन्हे परत घ्या अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या