🌟परभणी जिल्ह्यात २४ तासात : सरासरी १०.१ मि.मी. पावसाची नोंद...!


🌟औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही १२.२ मिमी राहिली🌟 

परभणी (दि.७ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी केवळ १०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात (१६.५मिमी) झाला असून, त्याखालोखाल सोनपेठ व मानवत (१२.७), पुर्णा (१०.७), सेलू (९.९), परभणी (९.४ मिमी) झाला आहे. याशिवाय गंगाखेड (८.३ मिमी), पाथरी (६.८) आणि जिंतूर तालुक्यात (६.२मिमी) पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही १२.२ मिमी राहिली आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या