🌟खंडणी करीता अत्पवयीन मुलाचे अपहरण करून पळतुन नेणारा आरोपी सात तासात गजाआड....!


🌟नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा पोलिस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी🌟  

नांदेड (दि.०४ सप्टेंबर २०२३) - नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील तामसा पोलिस स्थानकात दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी ११-०० फिर्यादी नामे गितांजली शंकर कडवाने राहणार मध्यवर्ती बँके समोर तामसा ता.हदगाव जि.नांदेड यांनी प्रत्यक्ष येऊन फिर्याद दिली की फिर्यादी यांचा मुलगा ज्याचे वय ०७ वर्षे यास त्यांचे राहाते घरून आरोपी नामे सुनील दिगंबर कड़वाने वय २५ वर्षे रा.तामसा ता.हदगाव जि.नांदेड याने त्यास फिरायला घेऊन जातो म्हणुन घेऊन गेला व मुलाचे अपहरण करून फिर्यादीस तु माझ्या फोन-पे वर ०२ लाख रूपये पाठव नाहीतर तुला तुझा मूलगा दिसू देणार नाही असे म्हणून फोन कट केला वगैरे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिस स्टेशन तामसा या ठिकाणी  गुरनं ८३/२०२३ कलम ३८३,३८४/(ओ) भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्री मुंजाजी दळवी पो.स्टे.तामसा यांनी स्वतःकडे घेतला.

सदरील गुन्ह्याचे तपास कामी पोलीस स्टॉपसह रवाना होऊन रेल्वेस्टेशन नांदेड,धर्माबाद आणि बासर येथे जाऊन शोध घेतल. तसेच सायबर शाखेच्या मदतीने सदर आरोपीची माहिती काढून आरोपी व पिडीत मुलगा बासर रेल्वे स्टेशन जेथे शोध घेतला पिडीत मुलास सात तासाचे आत ताव्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून मुलास त्याचे आई गिता यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असुन तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिसक नांदेड, मा, श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, मा. श्रीमती शफकत आमना मेंडम, सहा. पोलीर अधिधक विभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री मुंजाजी दळवी, सपोनि पोस्टे तामसा, पोउपनि सरोदे, पोउपनि श्री गंगाप्रसाद दळवी, पोहेकों राजेंद्र सिटीकर, पोना दिपक ओडणे, पोकों दविद पिडगे, पोना गुंडेवार, पोकों गोंदगे, यांनी उत्तभ कामगीरी केली, त्यांच्या या कामगीरी बदल वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या