🌟परभणी जिल्ह्यात वाढत असलेल्या लंम्पीच्या प्रादुर्भावामुळे यंदा पोळा साधेपणानेच साजरा करा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रघुनाथ गावडे यांनी केले🌟 



परभणी (दि.११ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सध्या लम्पी या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या विषाणूजन्य रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पोळा सणानिमित्त बैल, गो-हे यांना गावात एकत्र आणू नये. त्यामुळे यंदा पोळा साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार परभणी जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित आला आहे. हा आदेश जिल्ह्यात 23 ऑगस्टपासून लागू करण्यात आला असून, त्यामुळे या आदेशान्वये जनावरांच्या आठवडी बाजारात आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतुकीस प्रतिबंध तसेच गोवंशिय जनावरांचे एकत्रित मेळावे,  प्रदर्शन,  शर्यती आयोजित करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.

जिल्ह्यात पोळ्याचा सण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात साजरा केला जातो. या वर्षी सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाधित जनावरांपासून संसर्ग होवून चांगली, सुदृढ जनावरांना बाधा होऊ नये किंवा एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे. या वर्षी प्राण्यांवर या आजाराचे सावट असल्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी हा सण आपल्या घरीच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे व जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे.....  

*-*-*-*-*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या