🌟परभणीत ही सकल मराठा समाजाच्या वतीने अंतरवली सराटी अमानुष लाठी हल्ल्याचा तिव्र निषेध....!


🌟सकल मराठा समाजाच्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद : संपूर्ण व्यापारीपेठा ठप्प घटनेच्या निषेधार्थ तरुणांनी काढला मोर्चा🌟


परभणी (दि.02 सप्टेंबर 2023) - जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांसह माता भगिनींवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी माराच्या निषेधार्थ आज शनिवार दि.02 सप्टेंबर 2023 रोजी परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी सकल मराठा समाजासह अन्य पक्ष व संस्था संघटनांचे वतीने शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी व्यापारी पेठा बंद ठेवून उस्फुर्त प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून कालच्या घटनेचा निषेध केला.काही ठिकाणी पोलिसांच्या भूमिकेचे निषेधार्थ प्रशासनास निवेदन सादर करून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या.

परभणीत काल रात्रीपासून पडसाद उमटू लागले.आज सकाळपासून मध्यवस्तीतील व्यापारी पेठाबंद होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात युवकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली  तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला,या मोर्चा करांना पोलिसांनी  प्रवेशद्वारांवर अडवले. दरम्यानस्टेशन रोड भागातील व्यापारी पेठा लगेचच बंद झाल्या.परंतु या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नुकसान होऊ नये म्हणून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बस वाहतूक ठिकठिकाणी रोखून धरली, त्यामुळे परभणी विभागीय नियंत्रकांच्या कार्यक्षेत्रातील विविध आगारात बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या