🌟'त्या' एका एनओसी ने मंगरुळपीरचा कायमचा निकाली निघु शकतो विजप्रश्न....!


🌟राजकारणी विजसमस्येवर लक्ष देतील का ?🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-मंगरुळपीर शहरात आणी ग्रामीण भागात जणु विजसमस्या पाचविलाच पुजलेली आहे.विजेचा लपंडाव हा नेहमीचाच होवून बसलेला आहे.नियमित विजबिल भरणार्‍या ग्राहकांना नाहक मनस्ताप होत असल्याने विजवितरण कंपनीकडे ग्राहकांच्या तक्रारीचा खच पडलेला आहे.परंतु फक्त एक एनओसी मिळाली तर ही शहराची विजसमस्या कायमची निकाली निघु शकते.याकडे नेते राजकारणी तथा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला तर मंगरुळपीर शहरात चोविस तास विज ऊपलब्ध होवु शकते.

                 सविस्तर असे की,ओहरलोड आल्यामुळे शहराची विज नेहमीच खंडित होत आहे.छोट्या मोठ्या डिपि शाॅट होवुन जळत आहेत.परिणामी ते दुरुस्त करेपर्यत शहराचा विजपुरवठा खंडित होतो.शहरवाशीयांना अंधारात राहावे लागते.सर्व कार्यालये आॅनलाईन झाल्यामुळे कंपुटर प्रक्रिया खंडित होवुन परिनामी शासकीय कामेही खोळंबतात,पंखे बंद असल्याने गरमीत राहावे लागते.मच्छर चावतात त्यामुळे डेंगुसारखे आजार डोके वर काढतात.असे एक ना अनेक परिणाम विज नसल्याने शहरवाशीयांना त्यातल्या त्यात नियमित विजबिल भरणार्‍या ग्राहकांनाही होतो.कुण्या महावितरण अधिकारी आणी कर्मचार्‍यानेच जाणुनबुजुधन विज खंडित केल्याचा राग मनात धरुन काहिजन आक्रमक भुमिका घेतात,आंदोलने करतात,सोशल मिडियावर भडास काढतात.सध्या पावसानेही दडि मासल्याने विजेची समस्या ऊग्र बनलेली आहे.पण या सर्व बाबीवर इलाज हा शहरवाशीयांजवळच आहे.फक्त हवि मंगरुळपीर शहरालगतच्या शेलगाव ग्रामपंचायतची एनओसी.कारण RDSS स्किम मधुन विजवितरण कंपनीचे 33 Kv ऊपकेंद्र मंजुर झालेले आहे.सदर ऊपकेद्र हे शेलगाव १३२Kv च्या बाजुला कुठेही जिथे इक्लास किंवा ग्रामपंचायतची जागा उपलब्ध झाल्यास तिथे मंजुर असलेले ऊपकेंद्र निर्माण होईल.त्यामुळे शहरावरचा पुर्ण लोड एकाच विज ऊपकेंद्रावर न राहता विभागला जाईल आणि नियमित विज शहरवाशीयांना ऊपलब्ध होइल.मिळालेल्या माहितीनुसार शेलगाव ग्रामपंचायतकडुन अजुनही विज ऊपकेंद्रासाठी जागेची एनओसी न मिळाल्याने मंजुर असलेले ऊपकेंद्र होवु शकलेले नाही.विजसमस्येसाठी झटणार्‍या नेत्यांनी,कार्यकर्त्यांन,आमदार,खासदार आदी सबंधितांनी जर एनओसी ऊपलब्ध करुन दिल्यास शहरवाशीयांचा विजसमस्येचा प्रश्न निकाली निघु शकतो.

प्रतिनिधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या