🌟स्व.शहाजी कदम यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली🌟
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कळंब तालुक्यातील येरमाळा येथे भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी उपोषण करतांना 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री शहाजी कदम यांनी आत्महत्या केली. कदम यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी स्व. शहाजी कदम यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी कदम कुटूंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी त्यांनी शहाजी कदम यांच्या मुला मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांची शैक्षणिक तसेच त्यांना पुढे रोजगार उपलब्ध करून देऊन मुलामुलींची वैवाहिक व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारली. तसेच त्यांनी परिवाराशी संवाद साधला. स्व. शहाजी कदम यांच्या परिवाराला कुठलीही अडचण असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे सांत्वन भेटीच्या वेळी सांगितले.
तत्पूर्वी धाराशिव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला.मराठा आरक्षणासाठी समाजातील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल नये अशी विनंती मी सर्व बांधवांना करतो. असे टोकाचे पाऊल उचलणे हे आपल्या कुटुंबियांना दुःखात लोटणारे आहे. शासन आरक्षणाबाबत सकारात्मक असून बांधवांनी थोडा धीर धरावा अशी पुनःश्च विनंती करतो....
0 टिप्पण्या