🌟जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी येथील अमानुष लाठी हल्ल्याचा पुर्णेत छत्रपती प्रतिष्ठानने केला निषेध....!


🌟मराठा आंदोलनावर लाठी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाहीसह गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी🌟

पुर्णा (दि.०५ सप्टेंबर २०२३) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणासह सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने सुरु केलेल्या आंदोलन कर्त्यांसह माता भगिनींवर शुक्रवार दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून जोरदार लाठी हल्ला तसेच गोळीबार केला या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी पुर्णा येथे छत्रपती प्रतिष्ठानकडून तिव्र निषेध व्यक्त करत पुर्णा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

मराठा आंदोलनावर लाठी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करुन ग्रह मंत्र्यांनी स्वतःच्या ग्रहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, लवकरात लवकर मराठा आरक्षणावर तोडगा काढून मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक आरक्षण देऊन न्याय द्यावा व मराठा आंदोनकर्त्यांवरील पडलेल्या ३०७ सहित सर्वच गुन्हे माघे घेण्यात यावेत अश्या प्रमुख तीन मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.यावेळी उपस्थित पृथ्वीराज सूर्यवंशी, कामेश अंबोरे,  प्रताप कदम,राहुल गवते, ओंकार गायकवाड, अनिकेत कदम, अजय कदम, प्रदुम कदम, विजय टोंपे, शिवराज नरखेडे व सर्व छत्रपती प्रतिष्ठान चे सर्व शिवभक्त उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या