🌟गोळीबारासह कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे दोघे आरोपी अटकेत....!


🌟वाशिम शहर पोलीसांची उल्लेखनीय व धाडसी कामगिरी🌟

फुलचंद भगत - वाशिम

वाशिम :-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. वैयक्तिक वादातून भांडण विकोपाला गेल्याने ग्राम वाळकी मांजरे येथील दोन युवकांवर अग्निशस्त्राने गोळीबारासह कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलीसांना यश प्राप्त झाले आहे.

दि.१४.०८.२०२३ रोजी रात्री निमजगा ते वाळकी मांजरे रोडवर जुन्या वैयक्तिक वादातून दोन युवकांवर अग्निशस्त्राने गोळीबारासह कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढविण्यात आला होता. सदर प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दि.१५.०८.२०२३ रोजी पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.६९१/२३, कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ भादंवि सहकलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून सदर प्रकरणातील आरोपी फरार होते. दि.०४.०९.२०२३ रोजी प्राप्त गोपनीय माहितीवरून पो.स्टे.वाशिम शहरच्या तपास पथकाने सदर प्रकरणातील ०२ आरोपींना कनेरगाव नाका, जि.हिंगोली येथून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोउपनि.सचिन गोखले हे करत आहेत.

सदरच्या कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते, पो.नि.गजानन धंदर, पोउपनि.सचिन गोखले, पोहवा.लालमणी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, पोकॉ.उमेश चव्हाण, महादेव भिमटे, राहुल चव्हाण व संदीप दुतोंडे यांनी यशस्वी केली. नागरिकांनी सुजाण नागरिक या नात्याने अवैध शस्त्र धारकांची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनिधि:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या