🌟शेत मालकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून सालगड्याने केली गळफास लावून आत्महत्या....!


🌟सालगड्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्या बद्दल शेत मालक उध्दव सातपुते व मंगेश सातपुतेंच्या विरोधात गुन्हा दाखल🌟

 परभणी (दि.१९ सप्टेंबर २०२३) : शेतात काम करणाऱ्या सालगड्यास शेत मालकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासामुळे सालगड्याने रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी शेतातील धुऱ्यावर असलेल्या जांभळाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नृर्सिह पोखर्णी शिवारात घडली या घटने संदर्भात मयत सालगड्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल शेत मालक असलेल्या दोघां विरोधात दैठणा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

        पोखर्णी नृ. शिवारात रविवारी सकाळी ०७-०० वाजता बाळासाहेब राठोड हे शेतातील धूर्‍यावरील जांभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणात पुजा राठोड यांनी दैठणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत शेतमालक उध्दव सातपुते व मंगेश सातपुते या दोघांच्या सततच्या त्रासास कंटाळून बाळासाहेब राठोड यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय वळसे हे या प्रकरणात तपास करत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या