🌟चारठाणा शिवज्ञान इंग्लिश स्कूल मध्ये बाल गोपालांची दहीहंडी उत्साहात साजरी.....!


🌟यावेळी चिमुकल्यांनी राधा कृष्णाच्या गाण्यावर ठेका धरत नृत्य सादर केले🌟 


चारठाणा येथील शिवज्ञान इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्या बालगोपालांची दहीहंडी अत्यंत उत्साहात राधा कृष्णा चा गणवेश परिधान करून दहीहंडी फोडत सार्वजनिक माधव भोजन करत अत्यंत उत्साहात साजरी केली,

यावेळी चिमुकल्यांनी राधा कृष्णाच्या गाण्यावर ठेका धरत नृत्य सादर केले विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा या वेळी हजेरी लावून चिमुकल्यांचे कौतुक केले या वेळी शाळेचे संचालक संदिप देशमुख, प्रभाकर कुर्हे, सिमाताई देशमुख शिक्षक शेजल देशमुख, रुपाली खाडे, आरती पांचाळ आदींनी परिश्रम घेतले या वेळी देविदास देशमुख,विनायक देशमुख,बबनराव देशमुख,जगन राऊत आदी उपस्थित होते....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या