🌟महिन्याभरात मावेजाचा प्रश्न न सुटल्यास मुंबई मंत्रालया समोर करणार शेतकरी प्रसाद पोळ अमरण उपोषण...!


🌟पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्काचा मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ🌟  

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा मध्ये फरकंडा येथील बुडीत क्षेत्रात गेलेल्या शेतजमिनीचा उर्वरित शेतकऱ्यांना मावेजा मिळावा यासाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली मागणी पालम तालुक्यातील मौजे फरकडा येथील शेत सर्वे नंबर 144 मधील जास्त प्रमाणात जमिनी डिग्रस बंधारात गेल्या असून त्यातिल मी प्रसाद पोळ व माझे दोन भाऊ शेतकरी उर्वरित मोबदल्या पासून वंचित आहेत वेळोवेळी आम्ही संबंधीतांकडे पाठपूरावा करूनही नांदेड पाठबंधारे विभागा कडून दूर्लक्ष केले जात आहे तरी आपण जातीने लक्ष देउन शेतकरी वर्गाला मावेजा मिळवुन देउन उपकृत करावे.


महिन्याभरात मावेजाचा प्रश्न न सुटल्यास मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा तसेच  आपल्या कार्यालयाकडे खूप वेळा ईमेल केला असून अध्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही संबंधित विभागाकडे आदेशित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा तसेच तत्कालीन अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व उपोषण दरम्यान काही बरे वाईट झाल्यास तत्कालीन अधिकारी जबाबदार राहतील गंगाखेड उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी यांच्या कमिटीने अहवाल सादर केलेला मला मान्य नाही प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रसाद पौळ यांनी मंत्रालयासमोर उपोषण करण्यासाठी निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या