🌟परभणी येथून अल्पवयीन १४ वर्षीय बालकास अपहरण करून हत्या करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात...!


🌟अपहरण केलेल्या बालकाची नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात नेऊन निर्घृण हत्या करून फेकले माळाकोळीतील तळ्यात🌟 


परभणी (दि.०८ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील रहिवासी असलेल्या १४ वर्षीय बालकाचे काल गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास कृषीसारथी कॉलनी, वसमत रोड परभणी येथील गांधी विद्यालयाचे गेट समोरील रोडवरून अपहरण झाले होते या संदर्भात फिर्यादी प्रकाश ग्यानोजी बोबडे यांनी नवा मोंढा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले होते की त्यांचा अल्पवयीन मुलगा वय वर्षें १४ राहणार माटेगांव तालुका पुर्णा हा परभणीतील आधार गुरूकूल यशवंत नगर येथे शिक्षणासाठी राहत होता यास दोन अज्ञात इसमांनी त्यांचे विना नंबरची स्पलेंडर प्लस मोटार सायकल वर बसवून त्याचे अपहरण करून घेवून गेल्याचे नमूद केले होते त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन नवा मोंढा परभणी येथे गुरनं. ३२३/२०२३ कलम ३६३,३४ भादवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता

या संदर्भात परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी सदर गुन्ह्याचे गांर्भीय ओळखुन तात्काळ नवा मोंढा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेवून अपहत बालकाचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या. त्यावरून अपहत बालकाचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली. सर्व तांत्रीक बाबींची देखील तपासणी सुरू करण्यात आली.

तपासादरम्यपान अपहत मुलाच्या नातेवाईकांनी अपहत मुलाचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर प्रकाश बोबडे यास यातील आरोपींनी मोबाईलद्वारे चॅँटींग करून अपहरण केले व पैसे मागीतले असल्याचे मेसेज हजर केले. त्यावरून त्याचे तांत्रीक विश्लेषण करून आरोपींचा शोथ घेण्यात आला.

त्यासाठी पौलीस ठाणे नवा मोंढा, सायबर, व पोलीस ठाणे पालम यैधील अधिकारी व अमलदारांचे वेगवेगळे पधक आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. आरोपी हे चोरवड ता.पालम परिसरात लपून बसल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून आरोपी बालाजी राजाभाऊ चव्हाण वय २० वर्षे राहणार चोरवड तालुका पालम व नरेश संजय वय १८ वर्षे राहणार चोरवड तालुका पालम यांना चोरवड़ परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर बालकाचे अपहरण करून जिवे मारल्याचे कबूल केले आहे.


सदर तपासात अशी माहिती समोर आली की अपहत मुलाचा मोठा भाऊ व अपहरणकर्ते यांचे जुने संबंध होते. ते पाच वर्षापुर्वी परभणी येथे पारदेश्वर शाळेत एकत्र शिकायला होते. पौळ सरांचे हॉस्टेल मध्ये एकत्र राहायला होते. अपहरणकर्त्यांनी अपहत बालकाच्या मोठ्या भावास ३५ हजार रुपये दिले होते. त्याचा मोठा भाऊ हा सदरचे पैसे परत करत नव्हता व अपहरणकर्त्यांना प्रतिसाद देखील देत नक्हता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी अपहत बालकास कट रचून अपहरण करून चौरवड परिसरात नेले व नंतर मालेगांव, जिल्हा नांदेड येथे नेऊन जिवे मारल्याचे पोलिसांनी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.....

[जनसंपर्क अधिकारी परभणी जिल्हा पोलिस दल यांच्या प्रेस नोट आधारे]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या