🌟पुर्णेतील सौ.अनुराधा विष्णुदास पुनपाळे यांनी महालक्ष्मी सजावटीत साकारला जी २० महासभा कार्यक्रमाचा देखावा...!

 


🌟पुनपाळे कुटूंबाने महालक्ष्मी पुढे साकारलेला जी २० महासभा कार्यक्रमाचा देखावा कौतुकास्पद - आनंद अजमेरा


पुर्णा (दि.२३ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरातील सौ.अनुराधा विष्णुदास पुनपाळे यांच्या कल्पकतेतुन जगापुढे आदर्श ठरलेले महालक्ष्मी पुढील देखाव्यात जी २० महासभा सभामंडपातील विविध भरडधान्य कडधान्ये, सोलारवरील रोषणाई,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या  विश्वकर्मा विविध कलाकृती  व्यवसाय मार्गदर्शन अदी देखावे पाहुन माता भगिनींना आनंद झाला . काहीतरी नाविन्यपूर्ण  पहायला मिळाल्याचे बोलुन दाखवले.           वडीलोपार्जित एकत्र कुटूंबातील विविध देखाव्याची परंपरा ज्येष्ठ महीला सौ .अनुराधा विष्णुदास पुनपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंधरा दिवसापासुन घरातील सर्वजण  सौ. पुजा पुनपाळे ,सौ. प्रियंका पुनपाळे , सौ .गिता पुनपाळे , लिला कालानी , गोकुळदास पुनपाळे , हर्ष पुनपाळे , श्रवण पुनपाळे , प्रांजल पुनपाळे सर्व कुटुंब यांनी प्रयत्न करुन जी २० देखावा साकारला .त्यांना कु .तनिशा आनंद अजमेरा हिने ऑनलाईन सर्व माहीती पुरवण्यासाठी सहकार्य केले पूर्णा शहरातील माता महालक्ष्मी पुढील सजावटी  मध्ये जी  २० व विश्वकर्मा व्यवसाय मार्गदर्शन देखावा सर्वांना आवडला .

*******************************************

🌟पुनपाळे कुटूंबाने महालक्ष्मी पुढे साकारलेला जी २० महासभा कार्यक्रमाचा देखावा कौतुकास्पद - आनंद अजमेरा

          आधुनिक काळाची गरज म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेली जी २० महासभा कार्यक्रम जगाला आदर्श ठरली तोच देखावा महालक्ष्मी माता यांच्या समोर साकारला शहरातील सर्व माता भगिनींना पहायला मिळाला तो पुनपाळे कुटूंबामुळे सर्वांना आनंद झाला..... 

आनंद अजमेरा 

संस्थाअध्यक्ष , पूर्णा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या