🌟तालुका स्तरीय खो खो क्रिडा स्पर्धा जयक्रांती हायस्कूल फरकंडा येथे संपन्न....!


🌟यावेळी पालम तालुक्यातील सात शाळांनी १२ संघांचा सहभाग नोंदविला🌟


पालम :- पालम तालुका खो खो शालेय क्रिडा स्पर्धा जयक्रांति हायस्कूल फरकंडा येथे दि. 18/09/2023 सकाळी १०:०० वाजता सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव गाढे कार्यक्रमाचे उद्घाटक फरकंडा नगरीचे उपसरपंच विलासराव पौळ ,होते. प्रमुख पाहुणे बापूराव पौळ सरपंच , प्रभाकरराव पौळ, आंबादासराव पौळ ,बाळकृष्ण पौळ गुरुजी ,ह.भ.प एकनाथ महाराज, नामदेव जोंधळे ,तालुका संयोजक श्री मोतीराम शिंदे, क्रिडाशिक्षक डी.डी.दूधाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


    यावेळी पालम तालुक्यातील सात शाळांनी १२ संघांचा सहभाग नोंदविला.प्रथम व द्वितीय येणाऱ्या संघास फरकंडा येथील शहिद जवान जानकीराम आंबादासराव पौळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  त्यांचे वडील आंबादास विठ्ठलराव पौळ यांनी स्मृतिचिन्ह दिले. तसेच १७ वर्ष वयोगटातील प्रथम संघास उपसरपंच विलासराव पौळ यांनी ₹१०००/ तर १७ वर्ष वयोगटातील मुलीच्या विजयी संघास बापूराव पौळ  सरपंच यांनी   ₹१००० रोख रक्कम बक्षीस म्हणून ठेवले तसेच १४ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघास श्री नामताबादे सर (संत गाडगे बाबा हायस्कूल चोरवड) व मुलांच्या संघास श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप एकनाथ महाराज पौळ  यांनी ₹५००/ रोख रक्कम बक्षीस दिले . 


१४ वयोगटातील मूले जयक्रांती हायस्कूल फरकंडा प्रथम, जी प प्रशाळा डीग्रस,  मूली जयक्रांती हायस्कूल फरकंडा प्रथम, तर संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय खडी,द्वितीय.१७ वयोगटात मुले व मूली मधून प्रथम क्रमांक जयक्रांती हायस्कूल फरकंडा मूले,तर श्री संत गाडगेबाबा माध्यमिक वि चोरवड द्वितीय,,१९वर्ष वयोगटात मुले  व मूली प्रथम ममता मा. व उच्च माध्यमिक विद्यालय पालम यांनी पटकावले.


या स्पर्धेचे पंच.प्रा पंडित राठोड, सय्यद सिकंदर सर, श्री सुधाकर खंदारे सर श्री पांडुरंग येरमे सर यांनी काम पाहिले.गुण लेखन   बानेकर सर (जी प डिग्रस) इचनर सर, आर एच गोपाले सर यांनी काम पाहिले...

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयक्रांती हायस्कूल फरकंडा चे श्री पुंडलिक एंगडे, शिवदास फुलवळकर, . चव्हाण एन.जी., नरगरे, डि.एम, पवार ए.बी.,कुंभार , एन.एस. पौळ,ए.एस. भोसले बी. के.दतराव कुरे यांनी प्रयत्न करुन कार्यक्रम यशस्वी पार पाडला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या