🌟नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदींमधून रक्तदान शिबिरांचे आयोजन....!


🌟नांदेडातील खिजरा येथे महा रक्तदान शिबिर संपन्न : असंख्य मुस्लीम बांधवांनी केले रक्तदान🌟 

शेख इम्रान - नांदेड

नांदेड (दि.०४ सप्टेंबर २०२३)  मशिदींमध्ये केवळ नमाजच होत नाही तर मानवतेसाठी अनेक सेवाभावी कामेही केली जातात.या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदींमधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून गरजूंना रक्तदान करता येणार आहे. उपचार करून त्यांचे प्राण वाचू शकतात.

नांदेड येथील खिजरा येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात शुक्रवार दि.1 सप्टेंबर रोजी शुक्रवारची नमाज अदा करण्यात आली.या शिबिरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,त्यामध्ये मस्जिद नुरुल्ला, मस्जिद निमरा, मस्जिद इमामुद्दीन, मस्जिद हिलाल आणि मस्जिद खिजरा सहभागी झाले. शिबिरात मुफ्ती उबेद साहब यांनी देखील आपले रक्तदान करून इतर युवकांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक तरुणांसोबत एन.एस फारुकी यांनी मोलाची भूमिका बजावली.रक्त संकलनासाठी क्रिसेंट ब्लड सेंटर नांदेड टीमला आमंत्रित करण्यात आले होते.मेगा रक्तदान शिबिर आयोजित करण्याबद्दल क्रिसेंट ब्लड सेंटरचे संचालक मोहम्मद सिद्दिकी यांनी एनएस फरूखी आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले आणि आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या