🌟जिंतूर कडकडीत बंद राज्य सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध....!


🌟सकल मराठा समाज बांधवांकडून आयोजित मोर्चाने शहर दणाणले🌟


जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाचा विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या महिला पुरुषांवर अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्त व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 5 सप्टेंबर रोजी जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची अंत्ययात्रा काढून भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.


मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विविध ठिकाणी जनआंदोलन चालू आहेत मात्र राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चालढकल करत आहे परिणामी सरकारच्या विरोधात जण आक्रोश वाढत चालला त्यातच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या महिला पुरुषांवर पोलिसांनी लाठीहल्ला करून आंदोलन चिरडण्याचे काम करत असल्यामुळे मराठा समाजात तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत म्हणून सर्वत्र ठिकठिकाणी रास्तारोको,शहरबंद,उपोषण याच्या माध्यमातून आपला आक्रोश मांडत आहेत म्हणून जिंतूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाच्या मागण्यासाठी शहर कडकडीत बंद ठेऊन भव्य मोर्चा काढला शिवाय मोर्च्यात राज्य सरकारची तिरडी वरून अंत्ययात्रा काढली मोर्चात हजारोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते यावेळी मोर्चा तहसील कार्यलयात मागण्यांचे निवेदन देऊन समारोप करण्यात आला आजच्या बंद ला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे 100 टक्के बंद यशस्वी झाला मोर्चात तालुक्यातील हजारो तरुण सामील झाले होते दरम्यान पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता......


* मुंडन करून केला निषेध :-

राज्य सरकारची तिरडीवर अंत्ययात्रा काढण्यात आली होती यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश काजळे व संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अनिल गाडेकर यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला....

जिंतूर / बी.डी.रामपूरकर

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या