🌟पाथरी शहरातील गोल्डफिल्ड कोचिंग क्लासेस या खाजगी शिकवणी वर्गात चिमुल्यांनी केला शिक्षकदिन साजरा....!


🌟आपल्या गुरूजनांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत केला शिक्षक दिन साजरा🌟

प्रतिनिधी

पाथरी :- सप्टेबर शिक्षकदिन शहरातील गोल्डफिल्ड कोचिंग क्लासेस या खाजगी शिकवणी वर्गात चिमुकल्यांनी आपल्या गुरूजनांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देत साजरा केला.


पाथरी शहरातील एकतानगर भागात असलेल्या गोल्डफिल्ड कोचिंग क्लासेस येथे मंगळवार ५ सप्टेबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षकदिन साजरा करण्यात आला या वेळी या खाजगी शिकवणी वर्गाच्या संचालिका योगिता पैठणे सहशिक्षक मोमिन गुरुजी यांनी विद्यार्थ्यांसह डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुष्पहार अर्पण करून विनंम्र अभिवादन केले. यावेळी योगिता पैठणे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णण यांचा जिवनपट उलगडला.या नंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनां प्रति कृतज्ञता व्यक्त करत गुलाबपुष्प देत त्यांचेआशिर्वाद घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन या शिकवणी वर्गाच्या पदाधिका-यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या