🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाच्या दंडेलशाही विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...!


🌟ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाच्या सुडसत्राला जिल्हा प्रशासनही घालतय पाठीशी ? कारवाई करण्यास टाळाटाळ🌟


परभणी/पुर्णा (दि.०४ सप्टेंबर २०२३) - जनसामान्यांच्या मतदानावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वतःला जनसामान्यांचे सेवक समजून जनसेवा करण्याऐवजी जनसामान्यांचे मालक समजून लोकशाहीचे रुपांतर ठोकशाहीत करीत सर्वसामान्यांसह लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबावर देखील सुड उगवत असल्याच्या घटना परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यात सातत्याने घडतांना पाहावयास मिळत असून असाच एक गंभीर प्रकार तालुक्यातील ताडकळस येथे देखील घडला असून जनहीताशी बांधिलकी जोपासत पत्रकारीता करीत असतांना ताडकळस गावातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावलेल्या बातमीचा एवढा मोठा दुष्परिणाम आपणासह आपल्या कुटुंबाला देखील भोगावा लागेल याची यत्किंचितही कल्पना येथील पत्रकार फेरोज मुनवर खान पठाण यांना नव्हती गावातील रस्त्याची बातमी का लावली या कारणावरून ताडकळस ग्रामपंचायतचे जनमतातून निवडून आलेले सरपंच/उपसरपंच/ग्रामसेवक यांनी पत्रकार फेरोज पठाण यांच्या घरापुढील रस्ता दुरुस्तीसाठी टाकलेला मुरूम तर उचलून नेलाच त्याहीपेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देखील सुरु केला.


ताडकळस ग्रामपंचायतचे सरपंच/उपसरपंच/ग्रामसेवक या सेवक/लोकसेवकांनी या गोष्टीचा देखील विचार केला नाही की आपण ज्या पठाण कुटुंबावर सुड उगवत आहोत त्या देशभक्त कुटुंबातील दोन पठाण बंधू भारतीय सैन्य दलात देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत आहेत परंतु पदाच्या अहंकाराची मस्ती चढलेल्यांना देशभक्ती आणि जनहीताशी काय देणे घेणे आपल्या विरोधात बातमी लावलीच कशी ? असा प्रश्न उपस्थित करून पठाण कुटुंबाचा सुड उगवला जात असतांना जिल्ह्यातील प्रशासनासह वृत्तपत्र क्षेत्रातील ताटाखालील लाचार मांजरी देखील आपल्या लेखणीचा शेपटी प्रमाणे वापर करीत असल्याचा गंभीर प्रकार पाहावयास मिळत असल्यामुळे शेवटी पत्रकार फेरोज पठाण स्वाभिमानी सहकारी पत्रकार मंडळींनी हा प्रश्न जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या दालनात नेण्याच्या दृष्टीने आज सोमवार दि.०४ सप्टेंबर २०२३ रोजी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलनास सुरूवात केली असून यावरही न्याय मिळाला नाही तर यापुढे जिल्ह्यातील पत्रकार आमरण उपोषणासह तिव्र आंदोलना देखील सुरूवात करणार असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश नाईकवाडे यांनी म्हटले असून लोकशाहीत लोकशाही मार्गाने जनमतातून निवडून येवून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे दमण करणाऱ्या सरपंच/उपसरपंच यांचे पद रद्द करण्याची तसेच ग्रामसेवक यांना निलंबीत करण्याची देखील मागणी केली जाणार असून भारतीय सैन्य दलातील दोन सैनिकांच्या कुटुंबाशी सुडभावनेने वागणे निश्चितच संबंधित ठोकशहांना अंगलट येणार यात शंका नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या