🌟पुर्णा तालुक्यातील मौ.सोन्ना-पिंपळगाव लिखा येथे जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको....!


🌟सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी केले सोन्ना-पिंपळगाव शिववर रास्ता रोको आंदोलन🌟


पुर्णा (दि.०८ सप्टेंबर २०२३) - जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसह माय-माऊल्या माता भगिनींवर दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिस प्रशासनाने अमानुषपणाचा कळस गाठीत लाठी हल्ला करीत अश्रू धुरांचा मारा करीत गोळीबारही केला या अमानवीय घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात उमटत असून परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात देखील तिव्र असंतोष पसरला असून आज शुक्रवार दि.०८ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळच्या सुमारास पुर्णा तालुक्यातील सोन्ना येथील ग्रामस्थांसह सकल मराठा समाज बांधवांनी सोन्ना ग्रामपंचायतचे सरपंच शरदराव कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येवून या घटनेच्या निषेधार्थ सोन्ना-पिंपळगाव शिववर रास्ता रोको आंदोलन करीत संताप व्यक्त व्यक्त केला.

  यावेळी 'महाराष्ट्र शासनाचे करायचे काय खाली मुंडक वरी पाय'....'एक मराठा लाख मराठा'...'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे'....अश्या गगनभेदी घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यांच्या आंदोलना देखील यावेळी पाठींबा जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात तात्काळ निर्णय घेतला नाही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवा नेतृत्व तथा सरपंच शरद कदम यांनी दिला यानंतर मौ.सोन्ना व पिंपळगाव लिखा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमलेल्या ग्रामस्थांसह सकल मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी तिव्र निदर्शने केली..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या