🌟जायकवाडीच्या डाव्याकालव्याचे पाणी कुंभारपिंपळगावला आडवले ; शेतकऱ्यांमध्ये संताप.....!


🌟संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार संजय जाधव यांनी खडसावले🌟


प्रतिनिधी

परभणी (दि.०८ सप्टेंबर २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील चारही मंडळात पावसाचा खंड पडल्याने हलक्या रानातील पिके करपली,तर आता भारी जमिनितील पिकांची दयनिय अवस्था झालेली असताना ऊस पिकातही पंन्नास टक्के घट येणार हे निश्चित झाले आहे. या पिकां साठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने १ सप्टेबर पासुन डाव्याकालव्या व्दारे छत्रपती संभाजीनगर,जालना आणि परभणीतील तहानलेल्या पिकां साठी पाणी पाळी सोडलेली असतांना हे पाणी मनमानी पणे कुंभारपिंपळगाव येथे तीन गेट टाकुन आडवल्याचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधुन संताप व्यक्त करण्यात येत असुन या बाबत पाथरी तालुक्यातील जागरुक शेतकरी शिष्टमंडळाने तात्काळ खा संजय जाधव यांची भेट घे पाणी आडवल्याचा प्रकार सांगितल्या नंतर खा जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना धारेवर धरत असले प्रकार खपऊन घेणार नसुन तुमच्या वरिष्ठांना लवकरात लवकर बोलुन पाणी त्वरीत खाली सोडा असे खडसावल्याची क्लिप सोशल मिडियातुन व्हायरल होत आहे.

या वर्षी पावसाला सुरुवात झाली तीच मुळी खंड वृष्टीने अनेक ठिकाणी दुबार पेरणी नंतर ही पावसाच्या खंडामुळे पिके हातची गेली.त्यात पाथरी मंडळातील वाघाळा आणि पंचक्रशीत तीन महिण्याचा कालावधी लोटला तरी पाऊस झालाच नाही.बाभळगाव मंडळात कान्सुर,बाभळगाव,तारुगव्हाण,डाकुपिंप्री,बनई,लिंबा,विटा,मुदगल,फुलारवाडी,वंजारवाडी,डाकुपिंप्री या भागातील खरीप पिके अक्षरश:दुबार पेरणी नंतर ही करपुन गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे गेल्या तीन महिण्या पासुन पाथरी तालुक्याच्या आनेक भागात एकदाही जमिनिवर साचेल एवढा पाऊस झालेला नाही. सतत पाण्याच्या उपशामुळे विहिरी आणि कुपनलिका,गावतळे कोरडी पडलेली आहेत. गत वर्षी चांगले पाऊसमान झाल्याने तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. संपुर्ण उन्हाळ्यात ऊसाचे पिक जोमदार असतांना एैन पावसाळ्यात या ऊसाचे चिपाट होत आहे. तर काळ्याशार जमिनिवरील कापुस,सोयाबीन,तुर ही खरीपाची पिके शेवटची घटका माेजत आहेत.या सोबतच पाणवठे आटल्या मुळे जनावरे आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. 

अशा स्थितीत जायकवाडी पाटबंधारे विभागाने १ सप्टेबर पासुन जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेत हे पाणी छत्रपती संभाजीनगर,जालना आणि परभणीच्या शेतीपिकां साठी सोडले खरे मात्र तीन दिवसात पाथरीत येणारे पाणी सातदिवस झाले तरी पोहचत नसल्याने काही तरुन शेतक-यांनी याविषयाची खात्री केली असता डाव्या कालव्याचे पाणी हे आष्टीच्या वर कुंभारपिंपळगाव येथे डाव्या कालव्यातील गेट बंद करुन आडवल्याचा व्हिडिओ काढून या शेतक-यांनी व्हायरल केल्याने.घनसावंगी तालुक्यातील एका मात्तब्बर नेत्या विरोधात पाथरी तालुक्यातील शेतकरी सोशल मिडियातून संताप व्यक्त करत परभणी जिल्ह्यातील नेत्यांनी हालचाली कराव्या अशा याचना सुरू केल्या होत्या. या विषयी पाथरी तालुक्यातील काही सजग शेतकरी आणि उभाठा शिवसेनेच्या पदाधिका-यां सह परभणीचे खा. संजय जाधव यांची भेट घेत घडला प्रकार सांगितल्याने या विषयी खा जाधव यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरत असले प्रकार खपऊन घेणार नसल्याचे खडसावल्याचा व्हिडिओ ही व्हायरल होत आहे.खासदार जाधव यांनी या कामी पुढाकार घेतल्याने शेतकरी पुत्र सोशल मिडियातून आभार मानत आहेत.

इकडे पाथरीच्या जायकवाडी उपविभागाला शेतकरी बी ५९ या चारीला पाणी सोडा म्हणून मागिल चारपाच दिवसा पासुन उपविभागिय अधिकारी शैलेश लाहोटी,जायकवाडी  उपविभागाचे उपविभागिय अधिकारी यांना निवेदन देऊन याचना करत आहेत. देवनांद्रा येथेच पाणी पोहचले नसल्याने पाणी येताच बी ५९ चारीला त्वरीत पाणी सोडले जाईल अशी माहिती उपविभागिय अधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा वाघाळा येथील शेतकरी पदमाकरराव मोकाशे यांनी तेजन्यूजशी बोलतांना दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या