🌟गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील लाठीचार्ज घटनेचा निषेध...!


🌟अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांच्या या कृतीची तातडीने चौकशी करण्यात यावी - आमदार डॉ.गुट्टे

जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान झालेल्या घटनेचा तीव्र निषेध. आजपर्यंत लाखोच्या संख्येने ५७ मोर्चे अतिशय शांतता व अहिंसक मार्गाने यशस्वी करून जगात आदर्श घालून दिलेल्या मराठा मोर्चावर आता लाठीचार्ज करण्याची पोलीसांना गरज का वाटली ? तसेच पोलीसांवर दगडफेक करणारे मोर्चाकरी बांधव आहेत का ? याचीही सखोल व पारदर्शी चौकशी झालीच पाहिजे. व्यक्तीगत माझाही प्रत्येक आंदोलनास पाठींबा राहिला आहे. अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांच्या या कृतीची तातडीने चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पुर्णपणे पाठिंबा असल्याचे देखील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी म्हटले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या