🌟पडेगाव-मिटमिटा या भागासाठी अजून निधी उपलब्ध करू : आमदार संजय शिरसाट


🌟5 कोटीचे विकास कामाचा भूमिपूजन🌟

छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पोलीस कॉलनी, पोलीस कॉलनी, हरिपार्क, शिवनेरी कॉलनी, युवान होसिंग सोसायटी याभागात अनेक अपघात, पावसाळामध्ये अनेक अडचणीचा सामाना येथील रहिवाशी यांना करावा लागतं होता, आज खऱ्या अर्थाने या भागातील रस्त्याचे मोठ्या संख्येने लोकांच्या उपस्थित भूमिपूजन होऊन या कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिक, महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे या विकास कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते सपन्न झाले.

पडेगाव मिटमिटा या भागात गेल्या 2020 पासून याकडे विशेष लक्ष देण्याचे काम माझ्याकडून होतंय, या परिसरात अनेक कॉलनी, सोसायटीमध्ये अनेक रस्ते, ड्रेनेज लाईनचे काम प्रलंबित होते, त्यामुळे या भागातील लोकांना अनेक त्रास सहन करावा लागला, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून या भागासाठी विशेष निधी उपलब्ध करून घेत या भागाचा कायापालट केला, आता या परिसरात प्रत्येक कॉलनी, गल्लीगल्लीमध्ये रस्ते, ड्रेनेज लाईनच काम झाले आहेत आणि आज केलेल्या भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार, तसेच पडेगाव व मिटमिटा या भागाचा विकासासाठी 300 कोटींचा निधी ड्रेनेज लाईनकरिता मंजूर करून घेतला आहे ते काम देखील लवकर सुरु होईल या गावाला शहर बनवण्याचे काम मी करणार आहे, या प्रत्येक कॉलनीतील लोकांनी माझ्याकडे अनेक निवेदन सादर केले, पण त्यांनी दिलेल्या निवेदनानंतर माझ्याकडून लगेच कामाला सुरुवात होते ज्या लोकांनी माझ्या एका शब्दावर मला मतदान करून या मतदार संघांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांचा विश्वास मी कधी तोडणार नाही, येणाऱ्या काळात या परिसरात कुठलेही काम करण्यासाठी शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही आमदार संजय शिरसाट यांनी पडेगाव मिटमिटा या भागतील जनतेला दिले.

याभूमीपूजनप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, महिला आघाडी जिल्हा संघटक शिल्पारांनी वाडकर, हर्षदा शिरसाट,उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के, रमेश बाहुले, शहर संघटक संजय बारवाल, माजी नगरसेवक गजानन बारवाल, रखमाजी जाधव, भाऊसाहेब सुरासे, हिरालाल वानी, नवनाथ मुळे, गणेश रविवाले, शाखाप्रमुख राहुल येलदी, युवासेना जिल्हा समन्व्यक नंदू म्हस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार संजय शिरसाट यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या संपर्क कार्यायल्यात गेले तेव्हा आम्ही जी मागणी केली ती लगेच पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले, पोलीस कॉलनी, पोलीस कॉलनी, हरिपार्क, शिवनेरी कॉलनी, युवान होसिंग सोसायटी आणि इतर भागात बऱ्याच वर्षांपासून रस्ते, ड्रेनेज लाईनच काम झाले नव्हते, त्यामुळे लोकांना खूप अडचणीचा सामना करावा लागला, त्यामुळे या संदर्भात जेव्हा आम्ही आमदार शिरसाट यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी या परिसरासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, याआधी देखील बऱ्याच भागचा विकासासाठी अनेक कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, आमच्या पडेगाव -मिटमिटा हे जरी मनपा असले तरी या भागाला ग्रामीण भागाचा लोक समजतात परंतु आमदार संजय शिरसाट यांनी या भागाचा चेहरामोहरा बदलून गावाला शहर बनविणाचे काम करत आहे, या भागाचा विकास फक्त आमदार संजय शिरसाट करू शकतात त्यामुळे आम्हाला कसली चिंता नाही असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांनी केले.

याप्रसंगी दादाराव शेजूळ, प्रकाश दुबिले, किसन कणीसे, खंडू म्हस्के, सचिन महाजन, उमेश चव्हाण, सोनू साबळे, सुभाष ठोंबरे, राहुल वाणी, हरीश दुबिले, सन्नी आढाव, महेश सुरासे, मनोज फुलारे, रमेश चव्हाण, गणेश शेळके, ओम हिवाळे, सचिन वयसले, वैभव घुले, विशाल घुले, सुरज आढाव, विकास गोर्डे,  राजू कनगरी, फेय्याज पटेल, प्रवीण शिंदे, अमोल मुळे, राहुल वाणी, बजरंग वाणी, किरण मुळे, हिरालाल वाणी, ऋतिक अग्रवाल व पडेगाव मीटमिटा या भागातील मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या