🌟परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील सकल मराठा समाजाने जालना घटनेच्या निषेधार्थ पाळला कडकडीत बंद...!


🌟सकल मराठा समाजाच्या बंदला उस्फुर्त प्रतिसाद : व्यापारपेठ कडकडीत बंद🌟

परभणी/सोनपेठ (दि.०२ सप्टेंबर २०२३) - जालना येथील मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसी बळाचा वापर करुन आंदोलकांना हटवण्यासाठी झालेल्या लाठीचार्ज व गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज शनिवार दि.०२ सप्टेंबर २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहर व तालुका कडकडीत बंद ठेऊन निषेध करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी शुक्रवारी दुपारी पोलिसांनी लाठीमार व हवेत गोळीबार केला.मनोज जरांगे व इतर आठ ते दहाजण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून उपोषणाला बसले होते. उपोषणार्थींची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून उपोषणार्थींना हलवण्याचा प्रयत्न केल्यावर उपोषणकर्ते व गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला व हवेत गोळीबार केला. यात मोठ्या संख्येने गावकरी व उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी शांततामय मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.२) रोजी सोनपेठ बंदची हाक देण्यात आली होती. शनिवारी सकाळपासूनच बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र जमुन झालेल्या घटनेचा निषेध केला व दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.यावेळी प्रास्ताविक अशोक भुसारे यांनी केले. तर शिवाजी कदम ,बळीराम काटे,संतोष गवळी,सुधीर बिंदु,गौस कुरेशी,आषिश मुंडे,साजेद कुरेशी, राजेभाऊ कराड, रामेश्वर वाकेकर यांच्या सह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी अशोक भुसारे,रंजीत देशमुख,सचिन घोडके, गोविंद वाकडे, गोविंद चोरमले,शुभम रेडे,नारायण रोडे,निलेश भाडुळे गोविंद भुसारे, शिवाजी लिंबुटकर, राजेभाऊ कराडे, रामेश्वर वाकेकर,अतुल शिंदे, महेश परांडे,योगेश नाईकवाडे, शंकर मोरे,अशोक यादव,मधुकर निरपणे,जनार्धन झिरपे, कृष्णा पिंगळे, भगवान पायघन,जगनाथ कोलते, रुस्तुम तुपसमुद्रे,प्रताप भंडारे यांच्या सह मोठ्या संख्येने तरुण यावेळी उपस्थित होते.यावेळी मंडळ अधिकारी पंडीत सुरवसे यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे,उप निरीक्षक मंचक फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

….............   .............

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलका वरील लाठीमारच्या  निषेधार्थ सोनपेठ बंद ठेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या