🌟परभणीत रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान...!


🌟जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात करण्यात आले अन्नदान🌟

परभणी (दि.०३ सप्टेंबर २०२३) - शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव तथा मराठी पत्रकार संघ महानगर सहसचिव तथा डिझीटल मीडिया परिषद परभणी प्रमुख तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अशोकराव अंभोरे यांची कन्या कु.ध्रुवी अंभोरे हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्त माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले डोंबिवली शहर उपाध्यक्ष ऍड.सुभाष अंभोरे दुधगावकर यांच्या संकल्पनेतून व देणगीतून परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी खिचडी स्वरूपात अन्नदान करण्यात आले  आहे. 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व्यापारी आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ येटेवाड, समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेख अझहर, पत्रकार प्रदीप लांडगे, संदिप वायवळ, तसेच वसतिगृहातील विध्यार्थी निखिल बेटके, प्रशिक वानखेडे, आदर्श खिल्लारे, राजदीप खिल्लारे, रामसिंग अंभोरे, आदित्य गाढवे आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या