🌟ना.धनंजय मुंडे यांच्या शैक्षणीक संस्थेचे सारथी🌟
मराठवाड्यातील शिक्षणाची पंढरी असलेल्या लातुर येथील शिक्षणाचा पॅटर्न घेवुन ते शिक्षण बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावी मिळावे हेच जीवनाचे ध्येय घेवुन शैक्षणीक क्षेत्रात पंधरा वर्षापुर्वी सेवाभावी संस्था स्थापन करत त्या माध्यमातुन अध्यापक विद्यालयाची सुरुवात केल्यानंतर या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे निर्माण करण्याबरोबरच विकास व शैक्षणीक क्षेत्रात प्रगती करण्याची भुमिका असलेले राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे कौटुंबिक नातलग.नाथ शैक्षणीक संस्थेच्या सहसचिव पदाचा कार्यभार सांभाळत शिक्षणातुन समाजप्रगती साधणारे,सामाजीक,धार्मिक कार्याच्या माध्यमातुन आपल्या नेतृत्वगुणांचा समाजाला परिसस्पर्श लाभलेले व्यक्तीमत्व म्हणुन कै.रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष,नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिपराव शिवाजीराव खाडे यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
धारुर सारख्या शिक्षणापासुन कोसो दुर असलेल्या तालुक्यातील कांदेवाडी गावातील प्रतिष्ठीत रामभाऊ खाडे घराण्यातील शिवाजीराव यांना प्रदिप,विलास व बालासाहेब ही तीन मुले व मिना ही एक मुलगी असा परिवार.आजोळ कांदेवाडीपासुन जवळच असलेले संगम.खाडे कुटुबांतील प्रदिपराव यांचे प्राथमिक शिक्षण कांदेवाडी माध्यमिक शिक्षण परळीतील सरस्वती विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झालेले.10 वी नंतर कृषी पदविका केल्यानंतर इतरांप्रमाणे सहाजिकच नोकरीच्या शोधात असलेल्या प्रदिपराव यांना गडचिरोली येथे नोकरीसाठी ऑर्डरही आली.वडील बीड जिल्हा बॅंकेत कार्यरत असल्याने व घरातील इतर मंडळींचा गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करण्यास विरोध असल्याने रुजु होवुनही प्रदिपराव यांनी नोकरी सोडली.कै.रामभाऊआण्णा खाडे व साहेबराव बाजीराव डापकर (दुकानदार) हे दोन्हीकडील आजोबा पंचक्रोशीत प्रतिष्ठीत म्हणुन ओळखले जातात.
अशा या कुटुंबाच्या सानिध्यात शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी जवळुन अनुभवलेल्या प्रदिपराव यांना ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली.याच दरम्यान रावसाहेब चाटे,बाप्पा शिंदे सारखे शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीमत्वाच्या सानिध्यात आल्यानंतर एकटे पुढे जाण्यापेक्षा ग्रामीण भागातील सर्वसामान्य पुढे नेऊ या उद्देशाने कै.रामभाऊ (आण्णा) खाडे सेवाभावी संस्था लातुर या संस्थेची स्थापना केली.संस्थेचे सचिव व्यंकटेश पापा मुंडे व उपाध्यक्ष बालाजी फड यांच्या भक्कम सहकार्याने 2008- 09 साली अध्यापक विद्यालयाचा दिंद्रुड ता.माजलगाव येथे पहिला वर्ग सुरु केला.मागील 13 वर्षात या अध्यापक विद्यालयातुन 1200 विद्यार्थी पास झाले असुन यात 36 जण शिक्षक,एक पीएसआय,एक नायब तहसिलदार पदावर रुजु झाले आहेत.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जिल्हा प्राचार्य सुभाष कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली 2008-09 साली ज्युनिअर कॉलेज मंजुर केल्यानंतर हिंगणी बु.ता.धारुर येथे यश जुनिअर कॉलेज सुरु केले.यश कनिष्ठ महाविद्यालय,नंदनज ता. परळी वैजनाथ.यश इंटरनॅशनल (CBSC ) स्कूल अँड ज्यूनियर कॉलेज,दिंद्रुड ता.माजलगाव.यश डी.एल.एम.टी. & नर्सिंग कॉलेज दिंद्रुड ता. माजलगाव.यश बी.एस्सी. बायोइन्फोरमॅटिक्स कॉलेज,लातूर पडीले कॉम्पलॅक्स,लातूर जि. लातूर.रमन ज्यू. कॉलेज (कला, विज्ञान, वाणिज्य) पूस ता. अंबाजोगाई.यश प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगम ता. धारुर.स्मारक माध्यमिक विद्यालय, श्रीरामपूर जि.अहमदनगर अशा संस्थांचे जाळे निर्माण करत बीड,लातुर व अहमदनगर या जिल्ह्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होत आहे.अथक परिश्रमांतून गुणवत्ता सिध्द केलेले दिंद्रुड येथील अध्यापक विद्यालय सीसीटिव्हीच्या निगराणीत परिक्षा घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अध्यापक विद्यालय ठरले आहे.केवळ बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रगती व स्पर्धा असलेल्या लातुर येथे एकमेव यश बी.एस्सी.बायोइन्फोरमॅटिक्स कॉलेजमुळे लातुरच्या शिक्षणक्षेत्रातील गुणवत्तेत भर टाकली आहे.परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्यवाढीसाठी दीर्घकालीन न्यालयीन लढा देत कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह 300 जणांची सदस्यवाढ करण्याबरोबरच या शिक्षण संस्थेच्या निवडणुका लागु होण्यापासुन होईपर्यंत असलेल्या महत्वपुर्ण योगदानामुळे ना.धनंजय मुंडे याबाबत हे सर्व प्रदिप याच्यामुळे शक्य झाल्याचे गौरवोद्गार काढले होते.
@@@@@@
* ना.धनंजय मुंडे यांच्या शैक्षणीक संस्थेचे सारथी :-
राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणीक क्षेत्रात क्रांती करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहेत.यामध्ये सध्या नाथ शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, परळी-वैजनाथ. मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परळी-वैजनाथ.शारदा विद्या मंदिर प्रा.वि / मा. वि, बँक कॉलनी, जिरेवाडी,परळी-वैजनाथ.शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनकुदळे विद्यालय, संगम,परळी-वैजनाथ.मिलिंद प्राथमिक विद्यालय,बरकत नगर (शिवनगर), परळी-वैजनाथ.अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय सिरसाळा.जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय गोपाळपूर तालुका किल्ले धारूर.या विद्यालय व महाविद्यालयातुन हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणुन प्रदिपराव खाडे यांनी काम करत असताना आपल्या कल्पकतेने अल्पावधीतच या शाळा नावारुपास आणल्या आहेत.मराठी माध्यमाची असलेल्या मिलिंद विद्यालयाला यावर्षी प्रथमच प्रवेश फुल चा बोर्ड लावावा लागला.ना.धनंजय मुंडे यांच्या या शैक्षणीक संस्थेचे सारथी म्हणुन
सहसचिव प्रदिपराव खाडे यांची शिक्षण क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे
@@@@@@
*धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य :-
प्रदिपराव खाडे व खाडे परिवार नेहमीच धार्मिक कार्यात सहभागी असते.आपल्या जन्मगावी कांदेवाडी येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करुन महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची किर्तनसेवा,अंबाजोगाई येथील
केदारनाथ मंदिरासाठी शेड उभारत या मंदिरात येणार्या भाविकांसोबतच मंदिरात आयोजीत धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उपयुक्त अशी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.याबरोबरच संगम येथे अन्नदान,देवदहिफळ येथील खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट.याबरोबरच प्रभाकर महाराज झोलकर यांच्या सद्गुरु आश्रमास सढळ हाताने मदत अशा धार्मिक कार्यात तन-मन-धनाने सहभाग असतो*
@@@@@
@@@@@
*शैक्षणिक,धार्मिक कार्यात कुटुंबियांची मोलाची साथ
कुठलेही कार्य करण्यासाठी कुटुंबियांची साथ आवश्यकच असते.प्रदिपराव खाडे हे शिक्षण,धार्मिक कार्यात अग्रेसर रहात कार्य करत असताना सुविद्य पत्नी दैवता(सोनल) यांची सावलीसारखी साथ लाभत आहे.संपुर्ण खाडे कुटुंबिय प्रदिपराव यांच्यासोबत प्रत्येक निर्णयात असल्याने आज खाडे कुटुंबाचे नाव आदराने घेतले जाते*
- महादेव गित्ते*
पत्रकार, परळी वैजनाथ
0 टिप्पण्या