🌟परभणी येथील प्रा.डॉ.जयदीप कोपरेकर मानांकित 'राष्ट्रीय महात्मा गांधी सन्मान पुरस्कार-२०२३' या पुरस्काराने सन्मानित....!


🌟त्यांच्या आई सौ लता जनकराव कुलकर्णी (कोपरेकर) व वडील श्री जनकराव कोपरेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला🌟

परभणी : परभणी येथे मीडिया चॅरिटेबल फौंडेशन (ऑल इंडिया) या सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत देण्यात येणारा 'राष्ट्रीय महात्मा गांधी सन्मान पुरस्कार-२०२३' हा मानांकित पुरस्कार काल रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी परभणी येथील संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ जयदीप कोपरेकर यांना बहाल करण्यात आला आहे. 

शासकीय कर्तव्य बजावत असल्या कारणाने स्वतः उपस्थित राहु शकले नसल्या कारणाने त्यांच्या आई सौ लता जनकराव कुलकर्णी (कोपरेकर) व वडील श्री जनकराव कोपरेकर यांनी हा पुरस्कार प्रा.डॉ.जयदीप कोपरेकर यांच्या वतीने स्वीकारला आहे. या पुरस्काराने त्याचे आई, वडील, कुटुंबीय, आप्त परिवार व मित्र परिवार हर्ष उल्हासित झालेला असुन प्रा डॉ जयदीप कोपरेकर यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. प्रा डॉ जयदीप कोपरेकर यांची उत्तरोत्तर प्रगती होवो व सामाजिक क्षेत्रात घवघवीत यश प्राप्त होवो अश्या शुभेच्छा या निमित्ताने सर्व मित्र परिवाराकडून देण्यात येत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या